शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

..अन् न्यू पॅलेसचा दरबार गहिवरला!

By admin | Updated: June 13, 2016 00:57 IST

संभाजीराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव : सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह समाजाच्या सर्व स्तरातील मान्यवरांची गर्दी

कोल्हापूर : राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नियुक्ती झालेल्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी न्यू पॅलेसवर अलोट गर्दी केली होती. सुमारे पाच तास शुभेच्छुकांची गर्दी होती. छत्रपती घराण्याचे हे निवासस्थान असलेला न्यू पॅलेस परिसर आनंदी अन् जल्लोषी वातावरणाने न्हाऊन निघाला. फटाक्याच्या आतषबाजीने न्यू पॅलेसवर जणू दिवाळीच साजरी झाली. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती घोषणा झाली. त्यावेळी ते सहकुटुंब बाहेरगावी होते. रविवारी पहाटे ते कोल्हापुरात न्यू पॅलेसवर आपल्या निवासस्थानी पोहोचले. ते आल्याचे समजताच सकाळी सातपासून कार्यकर्त्यांची मांदियाळी न्यू पॅलेसवर सुरू झाली. सकाळी नऊ वाजता युवराज संभाजीराजे पॅलेसच्या सभागृहात मुलगा श्रीमंत युवराजकुमार शहाजीराजे यांच्यासोबत आले. तेथे राजेशाहीमध्ये थाटात त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी एकमेकाला गुलाल लावून आनंदोत्सव साजरा केला. सतेज पाटील यांच्याकडून शुभेच्छाआमदार सतेज पाटील यांनी महापौर, काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांसमवेत नूतन खासदार युवराज संभाजीराजे यांना रविवारी शुभेच्छा दिल्या.पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत आमदार पाटील हे सकाळी साडेअकराच्या सुमारास न्यू पॅलेस येथे आले तेथे त्यांनी संभाजीराजे यांचा सत्कार केला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक शारंगधर देशमुख, लाला भोसले, तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे, शशिकांत बनसोडे, निलोफर आजरेकर, वृषाली कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार, आदी उपस्थित होते. महाडिक, मंडलिक एकत्रलोकसभेसाठी परस्परांविरुद्ध उभारलेले खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक हे दोघे आपल्या कार्यकर्त्यांसह एकाचवेळी न्यू पॅलेसवर सकाळी अकरा वाजता आले. एकत्र चर्चा करतच जावून त्यांनी युवराज संभाजीराजे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अनेक सामाजिक विषयावरील कामांसाठी तिन्ही खासदार एकत्र विचार मांडू, असे संभाजीराजे यांनी यावेळी महाडिक यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमल महाडिक, रामराजे कुपेकर, नगरसेवक सत्यजीत कदम, संग्राम निकम तसेच ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)