शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

जनस्वास्थ्य अभियानाने नवी सुरुवात

By admin | Updated: December 31, 2014 00:09 IST

जनजागृती : जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उपक्रम

कोल्हापूर : व्यसनविरोधी आणि पर्यावरण प्रदूषणाच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून त्यांच्यामार्फत समाज व जनजागृती करण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीने ‘जनस्वास्थ्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने दि. १ ते ७ जानेवारी दरम्यान हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवलापूरकर म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहोत. या उपक्रमात जिल्ह्यातील ८५० शाळा सहभाग घेतात. या अभियानातून विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव होतेच; पण त्याचसोबत पर्यावरण प्रदूषणाबाबतही त्या जागरूक होतात. या अभियानात विविध उपक्रम आम्ही घेतो. तसेच प्रतिज्ञा, पोस्टर्स स्पर्धा, पथनाट्ये, विविध विषयांवरील व्याख्यानेही होणार आहेत. या अभियानातील आदर्श शाळा, आदर्श शिक्षिका, पोस्टर्स स्पर्धेतील विजेते, व्यसनविरोधी चळवळ राबविणाऱ्या संस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी ओंकार पाटील व पूजा गुरव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आठवडाभराचे अभियानगुरुवार, दि. १ जानेवारी : जागतिक सायकल दिन असल्याने आरोग्य व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक घेऊन सायकल फेरी.शुक्रवार, दि. २ जानेवारी : व्यसन, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्यासाठी मार्गदर्शन. शनिवारी, दि. ३ जानेवारी : किशोरवयीन लैंगिक समस्यांबाबत मार्गदर्शन सोमवार, दि. ५ जानेवारी : शाळेमध्ये स्वच्छता अभियान, कचऱ्यापासून खतनिर्मिती, रेनवॉटर हार्वेस्टिंगविषयी माहिती मंगळवार, दि. ६ जानेवारी : विविध आजारांबाबत दक्षता घेण्यासंबंधी मार्गदर्शनबुधवार, दि. ७ जानेवारी : दुपारी ४ ते ५ या वेळेत सर्व मुलांची आपापल्या शाळेच्या प्रमुख रस्त्यांवर रहदारीला अडथळा न आणता मानवी साखळी व व्यसनविरोधी घोषणा.