शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या प्रश्नांवर नव्याने लढाई

By admin | Updated: February 16, 2015 00:29 IST

श्रीपतराव शिंदे : बैठकीत घोषणा; आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहन

गडहिंग्लज : आकाशाला भिडलेल्या महागाईत सर्वसामान्यांना जगणेदेखील मुश्कील झाले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, देवदासी, दलित व महिलांचे प्रश्न जिथल्या तिथेच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नव्या लढाईला सज्ज व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केले.येथील साधना प्रशालेत आयोजित जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जनसंघर्षामुळे मिळालेली सत्ता व सामान्य कार्यकर्त्यांना मिळालेला मान-सन्मान, याचा आढावाही त्यांनी घेतला. कार्यकर्त्यांत आलेल्या मरगळीबद्दल खंत व्यक्त करतानाच आगामी निवडणुका व सामान्य जनतेसाठी पुन्हा कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिंदे म्हणाले, गावागावांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी आपले रक्ताचे नाते आहे. त्यांच्या पाठबळावरच आपण वाटचाल केली. संघर्षातून मिळालेल्या सत्तेचा जनतेसाठी उपयोग केला. यापुढेही सर्वसामान्यांसाठी संघर्ष आणि तत्त्वाचेच राजकारण केले जाईल. बाळेश नाईक म्हणाले, रेशनवरील धान्य, विजेची दरवाढ, भारनियमन, आदी प्रश्नांवर आंदोलनाची गरज आहे. शैलेश पाटील म्हणाले, नाउमेद न होता पुन्हा कार्यकर्त्यांनी पक्षकार्यात झोकून द्यावे.बापू म्हेत्री म्हणाले, देवदासी, दलित, बेरड व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा संघर्षाची गरज आहे.निंगाप्पा भमानगोळ म्हणाले, लोकांचे प्रश्न घेऊन लढल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस आणि प्रतिष्ठा नक्कीच मिळेल. यावेळी चंद्रकांत बंदी, अजित शिंदे यांचीही भाषणे झाली.बैठकीस गडहिंग्लज कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोरे, श्रीपती कदम, बाळासाहेब मोकाशी, भीमराव पाटील, शिवाजी काकडे, राम मजगी, बाळासाहेब शिंदे, गणपती नेवडे, रमेश मगदूम, तानाजी नाईक, उदय कदम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दत्ता मगदूम यांनी स्वागत केले. शशिकांत चोथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)