संस्थेकडे ५२ कोटी ७० लाख ९४ हजारांच्या ठेवी असून ६३ कोटी ९० लाख ६९ हजारांचे खेळते भांडवल आहे. अहवाल सालात ५ कोटी २३ लाख ८४ हजारांची कर्जे दिली आहेत. तर ६ कोटी ९२ लाख ६५ हजारांनी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. संस्थेने सामाजिक बांधीलकी म्हणून पूरग्रस्त साळगाव प्राथमिक शाळा व तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरी यांना मदत दिली आहे. संस्थेच्या कार्याचा गुणात्मक दर्जा उत्तम रितीने वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जनता गृहतारण संस्थेने सभासदांच्या घराबरोबर माणसं उभी केली आहेत. नफ्यापेक्षा माणसं जोडणारी संस्था म्हणून जनता गृहतारण संस्थेचा नावलौकिक असल्याचे स्वागत व प्रास्ताविकात अध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले. सभेसमोरील विषयांबाबत अर्जुन पाटील, विजय बांदेकर, आनंदा व्हसकोटी यासह सभासदांनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेले, सेवानिवृत्त, बढती मिळालेले सभासद व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा यावेळी सत्कार झाला. ऑनलाइन सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर, डॉ. तानाजी कावळे, लता शेटे, डॉ. अंजनी देशपांडे, नेहा पेडणेकर, व्यवस्थापक मधुकर खवरे यासह सर्व संचालक व सभासद सहभागी झाले होते. डॉ. अशोक बाचुळकर व प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले.
दहा वर्षातील प्रगती व अभिनंदन..!जनता गृहतारण संस्थेने गेल्या १० वर्षात चांगली आर्थिक गरुडझेप घेतली आहे. गल्लीबोळात गृहतारण संस्था होत असतानाही संस्थेची प्रगती अविश्वसनीय आहे. आर्थिक प्रगतीत योगदान दिलेले सर्व संचालक, कर्मचारी व सभासदांचे अभिनंदन करण्याचा ठराव विजय बांदेकर यांनी मांडला याला सर्वांनी टाळ्या वाजून मंजुरी दिली.
फोटो ओळी : आजऱ्यातील जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मारुती मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गणपतराव अरळगुंडकर, मधुकर खवरे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०९२०२१-गड-०२