शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नेसरीच्या अमित पाटीलची खुल्या गटात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:57 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी ‘लोकमत ’ ने पोलिस ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘महामॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी पुरुष खुल्या गटात नेसरीचाअमित पाटील, तर प्रौढांमध्ये पांडूरंग पाटील अव्वल स्थान पटकावित प्रथम क्रमांक पटकाविला.२१ कि.मी (खुला गट) पुरुष (विजेत्यांची नावे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी) : अमित पाटील (नेसरी), तुकाराम ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी ‘लोकमत ’ ने पोलिस ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘महामॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी पुरुष खुल्या गटात नेसरीचाअमित पाटील, तर प्रौढांमध्ये पांडूरंग पाटील अव्वल स्थान पटकावित प्रथम क्रमांक पटकाविला.२१ कि.मी (खुला गट) पुरुष (विजेत्यांची नावे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी) : अमित पाटील (नेसरी), तुकाराम मोरे (डब्ल्यूआरएस क्लब, कोल्हापूर), विष्णू आटोळे (सिद्धखेडराजा). २१ कि.मी (प्रौढ) पुरुष : पांडूरंग पाटील, विश्वास चौगुले, उदय महाजन (सर्व कोल्हापूर)२१. कि.मी डिफेन्स गट (पुरुष) : दीपक कुंभार(१०९ मराठा,टी.ए.बटालियन), अनंथा टि.एन(सैन्य दल, पुणे), अनिल जाधव(सैन्यदल,पुणे ).१० कि.मी (खुला) : पुरुष : राजाराम खौंदळ (शाहूवाडी), प्रतिक बंडगर(तात्यासाहेब कोरे मिलिटरी अ‍ॅकॅडमी, वारणानगर), युवराज बनसोडे (कोल्हापूर).१०.कि.मी (खुला) : महिला : सोनाली देसाई(कोल्हापूर), पुजा श्रीडोळे (लातूर), प्रतिक्षा पाटील (गडहिंग्लज).१०.कि.मी (प्रौढ) पुरुष : भगवान कच्छवे (औरंगाबाद), आबासाो इंदुलकर (उचगाव, कोल्हापूर),१० कि.मी. (प्रौढ) महिला : अनुराधा कच्छवे, माधुरी निमजे (औरंगाबाद), पल्लवी मूग (कोल्हापूर).रात्रभरचा प्रवासअन्... फिनिशिंग...आपल्या मुलांचे करिअर अ‍ॅथेलेटिक्समध्ये करिअर घडविण्याच्या उद्देशाने ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूरहून गुडूक कुटुंबीय सहभागी झाले होते. पाच व सहा वर्षाच्या साई व श्रद्धा यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे कुटुंबीय रात्रभर प्रवास करून पहाटे ते कोल्हापुरात दाखल झाले होते. स्पर्धेतील तीन किलोमीटर स्पर्धेत सहभाग नोंदवत स्पर्धेतील अंतिम टप्पा पार केल्यानंतर या कुटुंबीयाचा आनंद गगनाला मावत नव्हता.केशव हे खासगी कंपनी नोकरी करतात. तर वैशाली या गृहीणी आहेत. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याही या रनमध्ये सहभागी झाल्या होत्या. आपल्या दोन्ही मुलांना अ‍ॅथलेटिक बनवायचे आहे या उद्देशाने ते सहभागी झाले होते. या दोन्ही मुलांनी नॉनस्टॉप तीन किलोमीटर टप्पा पार केला. दोन्ही मुलांनी केलेल्या कामगिरीमुळे आई- वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. तर या स्पर्धेत सहभागी झाल्याने मुलांच्या आत्मविश्वास वाढला आहे. तसेच माझ्या पत्नीचे हृदयाची शस्त्रक्रिया होऊनसुद्धा फक्त मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ती या स्पर्धेत धावल्याने मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी केशव यांनी व्यक्त केली.