शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नेजचा पाझर तलाव झुडपाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:50 IST

भरत शास्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क बाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ...

भरत शास्त्री ।लोकमत न्यूज नेटवर्कबाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सध्या तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे शिवाय तलावाच्या बंधाऱ्याजवळ झाड-झुडपांमुळे बांधाच्या मजबुतीला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नेजचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.हा तलाव चार दशकांपूर्वी गावच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सन १९७२ मध्ये तयार करण्यात आला होता. नेज व आळते गावांच्या सीमेवर आळते गावाच्या हद्दीत या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. सदर जमिनीचे अधिग्रहण सन १९७८ मध्येच पूर्ण झाले होते तेव्हाच त्याचे कामही पूर्ण करण्यात आले होते; परंतु अनेक वर्षे सुस्त शासकीय यंत्रणेमुळे सदर जमीन संपादनानंतर ही मालकी हक्क लावून घेण्याचे काम प्रशासनाने केले नाही.त्यामुळे अनेक शेतकºयांनी या गोष्टींचा गैरफायदा घेऊन तलावाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले. अनेक एकर जमीन शेतकरी अवैध पद्धतीने कसत आहेत. हा सर्व प्रकार गेली अनेक वर्षे असाच सुरू आहे; पण तालुका व जिल्हा प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. ज्या हेतूने चार दशकांपूर्वी दूरदृष्टीने तलाव तयार केला होता. त्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ बसत आहे.हा तलाव ३३ एकर २१ गुंठ्यांमध्ये पसरलेला आहे. एवढा भव्य तलाव असल्याने याची चांगली डागडुजी व सतत नीगा राखल्यास ४०० ते ५०० एकर जमिनीवरील शेतीला याचा फायदा होईलच. शिवाय भागातील विहिरी व बोअरिंगच्या पाणीपातळीत वाढ होण्यास देखील मदत होईल. सध्या तलावाला डागडुजीची गरज आहे कारण जसे पावसात त्यामध्ये थोडे फार पाणी साठते ते पाणी बंधारा मजबूत नसल्याने गळून जाते.दरम्यान, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये येणाºया विहिरींना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन वर्षभर विविध प्रकारची पिके नेज-शिवपुरीच्या शेतकºयांना घेता येणार आहेत. तलावामधील अतिक्रमण व दुर्लक्षामुळे तलावाची उपयोगिता कमी झाली आहे. त्याचा फटका मात्र शेतकºयांना बसत आहे.गेल्यावर्षीपासून नेज ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु म्हणावे तेवढे यश त्यांच्या हाती लागले नाही. येणाºया पावसाच्या आधी तलावाचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने त्याचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी तालुका, जिल्हा प्रशासन व नेज ग्रामपंचायत अधिक प्रयत्न करतील, हीच अपेक्षा.