शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

परदेशी पोहोचलेलं ‘कलाट’ जिल्ह्यात अद्यापही दुर्लक्षित

By admin | Updated: January 28, 2017 22:36 IST

रेठरेच्या कलाकाराची शोकांतिका : ७२ व्या वर्षीही वादनात तरबेज

नारायण सातपुते -- रेठरे बुद्रुक येथील रज्जाक बाबालाल आंबेकरी यांनी कलाट वादनाच्या माध्यमातून संगीतामधील जाणकारांना पुरेपूर आनंद दिला आहेच. त्याचबरोबर सर्वसामान्य रसिकांनाही त्यांनी या वाद्याची भुरळ पाडली आहे. मंदिरे, धार्मिक समारंभ किंवा लग्नकार्याप्रसंगी बँडमध्ये वाजवलं जाणारं कलाट हे वाद्य त्यांनी अक्षरश: प्रसिद्धीच्या झोतात आणलं आहे. शासनाच्या विविध कला महोत्सव ते देशभरात अनेक ठिकाणच्या महोत्सवात सहभागी होऊन त्यांनी कलेची चुणूक दाखवली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, सौराष्ट्र व अमेरिकेतही त्यांच्या वादनामधील कलाविष्काराच्या ध्वनिफित पोहोचल्या आहेत. आजकाल डीजे व डॉल्बीच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई रज्जाक आंबेकरी यांच्या कलाट वादनावेळी थोडीशी थांबताना दिसते. वयाच्या चौदाव्या वर्षी सुरू केलेले कलाट वादन वयाची ७२ वर्षे सरली तरी जसेच्या तसे ऐकायला मिळते. सुरेल आणि गोड कलाट वादक रज्जाक आंबेकरी शासनाच्या मानधनापासून मात्र वंचित आहेत. पूर्वी जवळच्या कृष्णा नदीवर पूल नव्हता. त्यावेळी नावेतून प्रवास असायचा. ती नाव हाकणारी या गावातील आंबेकरी ही मंडळी. त्याच नावाड्यांच्या घरची पार्श्वभूमी असणारे रज्जाक आंबेकरी ऊर्फ रज्जाक मास्तर. वयाच्या दहाव्या वर्षी ते जलतरंग वादनात पारंगत होते. या अनुभवावर चौदाव्या वर्षी त्यांनी कलाट वादन आत्मसात केले. ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर बँड ही कला पोहोचवली त्या मिरज, जि. सांगली येथील बालेखान घराण्यामधील आसदखान यांच्याकडून ते ही कला शिकले. आज तब्बल ५९ वर्षे झाली तरी अव्यातहपणे व जसेच्या तसे ते कलाट वादन सादर करतात, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणतेही व्यसन अंगी न लावलेले रज्जाक मास्तर ठणठणीत दिसतात; पण उद्या वादन करणारे अवयव निकामी झाल्यास आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाचे कलाकार मानधनही त्यांना मिळत नाही. मात्र, हे यक्ष प्रश्न असले तरी रज्जाक मास्तरांनी कलाट वादन सुरूच ठेवले आहे. संगीतकार राम कदम, बंडोपंत, उषा चव्हाण यांच्या सहवासासह राज्यातील नामवंत लोकनाट्य तमाशाच्या पार्टीबरोबर त्यांनी आपली कला सादर केली आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सुखद प्रसंग सांगतात. मराठी पिंजरा चित्रपटामधील दे रे कान्हा, सुवर्ण सुंदरी या हिंदी चित्रपटामधील कुहू..कुहू बोले कोयलया, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, ज्योत से ज्योत जगाते चलो यासह सुमारे शंभर गीतांचा त्यांचा हुबेहुब सराव आहे. ए मालिक तेरे बंदे हम या गाण्यावर दिवंगत जयवंतराव भोसले यांच्याकडून मिळालेली दाद त्यांना विशेष स्मरणात आहे. कलाटला हवी राज्यमान्यतापूर्वीची वाद्ये कमी झालीत. आज डीजेचा जमाना असल्यामुळे कलाट वादनावेळी पूर्वीइतका जोश व उत्साह येत नाही. यासाठी शासनाने या वादनास राजमान्यता द्यावी.- रज्जाक आंबेकरी