शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अमृत योजनेला दानोळीचा ठाम विरोध

By admin | Updated: April 9, 2016 00:41 IST

वारणा पाणी प्रश्न : वारणा बचाव कृती समितीची स्थापना; उद्या दानोळी ‘बंद’ करणार

दानोळी : येथील वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, अशी ठाम भूमिका वारणा बचाव कृती समितीने दानोळी येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत या अमृत योजनेला हद्दपार करू, असा इशारा देऊन इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. उद्या, रविवारी ‘दानोळी बंद’चाही इशारा देण्यात आला आहे़ यावेळी माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, इचलकरंजी शहराची ही अमृत योजना नसून, भविष्यात दानोळीच्या शेतकऱ्यांना विष घेऊन आत्महत्या करणारी आहे़ आमदार हाळवणकर यांनी जनतेची दिशाभूल करून अमृत योजना घाईगडबडीत मंजूर केल्यामुळे यात नक्कीच काळाबाजार आहे़ इचलकरंजीची नदी ही पंचगंगा असून वारणा ही दानोळी परिसरातील लाखो नागरिकांची आहे़ या पाण्यावर इचलकरंजीकरांनी हक्क सांगू नये, अन्यथा वारणेचा हिसका दाखवू़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे म्हणाले, इचलकरंजी शहराने पंचगंगा नदीला दूषित केले आहे़ त्यामुळे या अमृत योजनेला आलेला ७१ कोटी रुपयांचा निधी पंचगंगा नदीचे पाणी शुद्धिकरण प्रकल्पासाठी वापरून इचलकरंजीकरांनी पंचगंगेचेच पाणी प्यावे, असा इशारा दिला़यावेळी पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव शिंदे म्हणाले, दानोळी ग्रामपंचायतीने फक्त शिष्टाचाराचे काम केले असून, याबाबतचा ग्रामपंचायतीने कोणताही ठराव दिलेला नाही़ आतापर्यंत कोणी मागितली नाही़, अशा परिस्थितीत ही योजना मंजूर कशी झाली, असा सवाल केला़ माजी सरपंच गुंडू दळवी म्हणाले, इचलकरंजीला पाणी देऊन दानोळी परिसरातील लोकांनी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कोठून घेणार? ही योजना जरी मंजूर झाली असली तरी वारणाकाठचे लोक या मंजुरीचा डाव हाणून पाडतील़ यावेळी माजी सरपंच बापूसो दळवी म्हणाले, दानोळीचा मराठवाडा व विदर्भ व्हायला नको़ तसेच गावातील कोणत्याही व्यक्तींने मतभेद न ठेवता एकत्र येऊन या इचलकरंजी अमृत योजनेला हाकलून लावण्यासाठी सज्ज राहावे. यावेळी मानाजीराव भोसले, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, रावसाहेब भिलवडे, केशव राऊत, विश्राम चव्हाण, सुनील शिंदे, अनिल खेत्राप्पा, आण्णासो पोलिस, पद्माकर कांबळे, सुरेश माणगावे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़सभेत झालेले ठरावइचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध, दानोळी गावात पंपहाऊस उपसा संचासाठी कोणताही शेतकरी जमीन देणार नाही, सर्व शासकीय अधिकारी, लोप्रतिनिधी यांना या योजनेसंदर्भात जबरदस्ती प्रवेश करू दिला जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे खोची ते कनवाडपर्यंतच्या गावांनी नामंजुरीचा ग्रामपंचायतीचा ठराव देणे, कोणाचाही राजकीय दबाव आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,याची दखल न घेतल्यास याचिका दाखल करणाऱ, इचलकरंजी नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था शोधावी, असे ठराव सभेत मंजूर करण्यात आले़जयसिंगपूर-सांगलीचा प्रस्ताव नाकारलाजयसिंगपूर व सांगली शहराने यापूर्वी दानोळी येथून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव दिला होता़ मात्र, दानोळीकरांनी हा प्रस्ताव धुडकावला असताना इचलकरंजी नगरपालिकेने अमृत योजनेस मंजुरी आणून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज, खोची, नरंदे, दुधगाव, कवठेपिराण, समडोळी, आदी गावांसह अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे दानोळी गावाने एल्गार उगारला आहे़