शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा नवीन स्रोत शोधणे काळाची गरज

By admin | Updated: September 16, 2014 00:38 IST

शिवराम भोजे : विश्वेश्वरय्या मेमोरियल अवॉर्ड अभियंता श्रीकांत माने यांना मरणोत्तर प्रदान

कोल्हापूर : जगात ज्या देशात विजेचा वापर जास्त होतो, त्या देशाची प्रगती होते. भारताचा विचार करता सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे. भविष्याचा विचार करता लोकसंख्या १६० कोटी होणार आहे. त्यामुळे नवीन ऊर्जेचे स्रोत शोधणे ही काळाची गरज बनली आहे. जणू हे मोठे आव्हानच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी केले. इंजिनिअर्स फौंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने अभियंता दिनानिमित्त देण्यात येणारा ‘सर भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या मेमोरिअल अवॉर्ड’ ज्येष्ठ अभियंता स्वर्गीय श्रीकांत माने यांना मरणोत्तर प्रदान आणि सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन व इंजिनिअर्स को-आॅप. के्रडिट सोसायटी यांनी नवीन बांधलेल्या वातानुकूलित सभागृहाला ‘अभियंता श्रीकांत माने सभागृह’ असे नाव देण्याच्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘महावितरण’चे संचालक अभिजित देशपांडे होते. डॉ. भोजे म्हणाले, ज्या देशाचा विजेचा वापर अधिक, त्या देशाची प्रगतीही झपाट्याने होते. भारताचा विचार करता, लोकसंखेची सव्वाशे कोटींहून १६० कोटींकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे भविष्यात विजेचा तुटवडा जाणवणार हे निश्चित आहे. याकरिता नवीन ऊर्जेचा स्रोत शोधणे काळाची गरज बनली आहे. अणुऊर्जा निर्मितीचे महत्त्व व त्यासंबंधीचे सर्वसामान्यांमध्ये असलेले गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. स्वर्गीय श्रीकांत माने यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, सध्या महावितरण कंपनीला स्पर्धेच्या युगात मानेसाहेबांसारखी दूरदृष्टी असणाऱ्या अभियंत्यांची नितांत आवश्यकता आहे. हा अवॉर्ड डॉ. भोजे यांच्या हस्ते स्वर्गीय श्रीकांत माने यांच्या पत्नी अरुणा माने व कन्या श्रेया माने आणि तेजस्विनी नलवडे यांनी स्वीकारला. सोसायटीचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी प्रास्ताविक, तर विजय राणे यांनी आभार मानले. यावेळी पारेषण कंपनीचे मुख्य अभियंता गणपत मुंडे, ‘एसईए’चे अध्यक्ष रामेश्वर माहुरे, राजाराम शितोळे, एसईएचे सचिव सुनील जगताप, दीपक कुमठेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)