शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

नगरपालिका चालविण्यासाठी शासनाकडून सहायक अनुदानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शहरातील विकासकामे पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे थकलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शहरातील विकासकामे पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे थकलेल्या १३७ कोटी रुपयांच्या सहायक अनुदानाच्या डोसची गरज आहे. एकत्र देणे शक्य नसल्यास काही टप्पे करून पहिल्या टप्प्यातील रक्कम तत्काळ मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही कारभार सुधारून काटकसरीचे धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

सन २०१९चा महापूर, त्यानंतर कोरोना आणि पुन्हा सन २०२१ला महापूर अशा सलग येणाऱ्या आपत्तींमुळे शहरातील वस्त्रोद्योगही जेमतेमच सुरू आहे. त्या उद्योगावरच शहरातील आर्थिक उलाढाल अवलंबून असल्याने एकूणच शहराची आर्थिक स्थिती मंदावली आहे. त्यामुळे दरवर्षी ८० ते ८५ टक्के वसूल होणारा नगरपालिकेच्या घरफाळा, पाणीपट्टी वसुलीत घट होऊन फक्त ५५ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे २८ कोटी १० लाख रुपयांची रक्कम थकीतसह ३२ कोटींवर पोहोचली आहे. नगरपालिका मालकीच्या दुकान गाळ्यांचा सन २०१५पासून फेरलिलाव झाला नाही. त्यामुळे त्या इमारतींचे भाडे आठ कोटी ३६ लाख रुपये मिळते, तेही लॉकडाऊनमुळे जेमतेमच वसूल होतात. नगरपालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत असणाऱ्या घटकांकडे पदाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे उत्पन्न आहे तेवढेच आणि खर्च मात्र वाढत चालला आहे. पालिकेतील काहीजण प्रत्येक कामात आपला ‘फायदा’ शोधत असल्याने अनेकवेळा अनावश्यक कामे केली जातात. त्यातूनही वायफळ खर्च होतो. पालिकेच्या उत्पन्नाबरोबरच शासनाकडून मिळणारे सहायक अनुदान थकीत राहिल्याने नगरपालिकेचा कारभार चालवणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. थकीत अनुदान मिळण्यासाठी थकबाकी रकमेत टप्पे करून शासनाकडून नगरपालिकेला सहायक अनुदान मिळवून देण्यासाठी आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी लक्ष घालून प्रयत्न करणे गरजेचे आहे. (उत्तरार्ध)

...........

गाळ्यांचा लिलाव प्रलंबित, अनधिकृत नळजोडणी, कृष्णा योजनेची वारंवार गळती, शहरातील रस्ते खोदाई अशी अनेक कामे अनावश्यक पद्धतीने केली जातात. यामध्ये लक्ष घातल्यास नगरपालिकेचा खर्च वाचण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया

शासनाकडून थकीत सहायक अनुदान मिळविण्यासाठी आमदार, खासदार व जिल्ह्यातील मंत्री महोदयांना सोबत घेऊन शासनाकडे पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली आहे. पाठपुरावा सुरू असून, अनुदान मिळाल्यास नगरपालिकेची आर्थिक घडी बसणार आहे.

- तानाजी पोवार, उपनगराध्यक्ष, इचलकरंजी नगरपालिका