शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांवर धाकासाठी ठोस कृतीची गरज

By admin | Updated: January 8, 2015 00:02 IST

पोलिसांना आव्हान : यड्राव, शहापूर, खोतवाडी परिसरात वाढती गुन्हेगारी

घन:शाम कुंभार - यड्राव-- खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून युवकाचा झालेला खून, तसेच ग्रामस्थांनीच हल्लेखोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे. यामुळे अवैद्य कृत्य करणाऱ्यांना कायद्याचे भय नसल्याचे धोतक आहे. यड्राव परिसर हा शहापूर पोलीस ठाण्याअंतर्गत समाविष्ट असल्याने असे कृत्य करणाऱ्यांना जरब बसविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांशी संवाद व अवैद्य कृत्य करणाऱ्यांना धाक दाखविण्याची वेळ शहापूर पोलीस ठाण्यावर आली आहे. यावरच परिसराची शांतता व सुरक्षितता अवलंबून आहे. मोबाईलवरील अश्लील मॅसेज प्रतिबंध करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.यड्राव पार्वती औद्योगिक वसाहत, शहापूरची लोटस पार्क, तारदाळची प्राईड इंडिया या औद्योगिक वसाहती व परिसरामध्ये उद्योगाचे जाळे पसरले आहे. यामध्ये पुरुषांबरोबर महिला कामगारांचा मोठा सहभाग आहे. या औद्योगिकीरणामुळे कामगार वर्ग मोठा आहे. चांगला पगार यामुळे शिक्षण सोडून काम करण्याकडे युवा वर्गाचा कल आहे. त्यामुळे अशिक्षितपणा व चांगल्या वाईटाचा अजाणतेपणा दिसून येतो. कमी वयात पैसे हातात आल्याने चैनी करण्याकडे कल, त्यातून व्यसन, स्मार्टफोन, अनैतिकपणा जोर धरत आहे. सध्या स्मार्टफोनवरून व्हॉटस्अ‍ॅप मेसेजची फार मोठी गडबड झाली आहे. कोणताही मेसेज अथवा फोटो क्षणात पाठविता येत आहे; परंतु लहान वय अज्ञानपणा अश्लीलतेविषयी आवड असणाऱ्या सवयीमुळे चुकीचे फोटो व मेसेज पाठविण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून गैरसमज, वादविवाद, हाणामारी यासारखे प्रकार घडत आहेत.वादावादी, मारामारी याला फक्त हेच कारण असते असे नसलेतरी मागील वाद यास कारणीभूत ठरतो. अशाच प्रकारातून खोतवाडी येथे युवकास बळी जावे लागले. हल्लेखोरही त्याच वयाचा, परंतु वैचारीकपणाच्या अभावामुळे हा प्रसंग उद्भवला.समाजातील वाईट कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक नसल्याने असे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी अवैद्य कृत्य करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम तसेच सर्वसामान्यांसाठी पोलिसांबरोबर विश्वासार्हता वाढविण्यासाठी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. यामुळेच पोलिसांना शांतता व सुरक्षितता राखणे सोपे जाणार आहे. (पूर्वार्ध)