शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयांची गरज

By admin | Updated: November 5, 2014 00:22 IST

संस्थानकालीन भालचंद्र थिएटरचा प्रश्न : न्यायालयीन वाद येताहेत शहराच्या विकासाआड

गणपती कोळी - कुरुंदवाड -येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्याठिकाणी शॉपिंग सेंटर बांधण्याच्या पालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हा प्रश्न न्यायालयीन वादात सापडला असून पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी, शहराच्या विकासासाठी राजकारण, प्रतिष्ठा बाजूला ठेवून पालिका पदाधिकारी, अधिकारी व याचिकाकर्त्यांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. न्यायालयीन वाद शहराच्या विकासाला आड येऊ शकतो.शहर व परिसरातील लोकांना करमणुकीसाठी १९१७ साली पटवर्धन सरकारांनी भालचंद्र मेमोरियल हॉल बांधला आहे. सुमारे बारा ते पंधरा गुंठ्यांमध्ये हॉल आहे. संस्थानकाळानंतर या थिएटरचा ताबा पालिकेकडे आला. थिएटर चालविण्यासाठी ठेका दिला जातो. शहराची वाढती लोकसंख्या, त्यांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पालिकेला करावी लागत असलेली कसरत यासाठी पालिकेने उत्पन्नवाढीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या थिएटरपासून पालिकेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. अन् घरोघरी अत्याधुनिक दूरचित्रवाहिनी संच असल्याने छोट्या पडद्यांवरील सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून त्याठिकाणी शहरात भेडसावणारा तळमजल्यावर पार्किंग, दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग सेंटर व अत्याधुनिक सिनेमागृह बांधण्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी पालिका सभागृहाने मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे नकाशा तयार करणे, इस्टिमेट करणे, बजेट मंजूर करून घेण्याचे कामही सुरू होते.मात्र, या इमारतीचे संवर्धन करावे यासाठी शहरातील कृष्णा लोकरे, अविनाश गुदले यांच्यासह चौघांनी पालिकेच्या ठरावाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शनिवारी, पहिली सुनावणी होऊन थिएटर पाडण्याला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे शहराच्या विकासाचा प्रश्न न्यायालयीन वादात सापडला आहे. वादातून शहराचा विकास होणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.शहरातील वाहन पार्किंगचा प्रश्न, खोकीधारकांना दुकानगाळ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शॉपिंग सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्नही मिटणार आहे. शिवाय पालिकेला दुकानगाळ्यांचे वर्षाला लाखो रुपयांचे अतिरिक्त सिनेमागृह बांधण्याचे इस्टिमेट आहे. त्यामुळे शहराच्या वैभवासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. - संजय खोत, नगराध्यक्ष