शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्यांसाठी लोकचळवळीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST

गडहिंग्लज : शेतकऱ्यांसह गावाच्या सोयीसाठीच पाणंद रस्ते आहेत. त्यांच्यावर कोणाचीही खासगी मालकी नाही. त्यांच्यावरील अतिक्रमणे दूर करून पाणंदी आनंदी ...

गडहिंग्लज : शेतकऱ्यांसह गावाच्या सोयीसाठीच पाणंद रस्ते आहेत. त्यांच्यावर कोणाचीही खासगी मालकी नाही. त्यांच्यावरील अतिक्रमणे दूर करून पाणंदी आनंदी करण्यासाठी लोकचळवळीची गरज आहे, असे मत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी व्यक्त केले.

महाराजस्व अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील पाणंद खुली करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. तहसिलदार दिनेश पारगे, पंचायत समितीचे सदस्य विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पांगारकर म्हणाल्या, पाणंद रस्ते खुले करण्यासाठी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र आणा.

वादाच्या ठिकाणी मोजणी करून घ्या. याप्रसंगी काही सरपंचांनी गावातील पाणंद रस्ते खुले करण्यासंदर्भात निवेदनेही दिली.

चर्चेत विकास मोकाशी, रवींद्र घेज्जी, प्रशांत देसाई, रामचंद्र पाटील यांनी सहभाग घेतला.

बैठकीस निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, नायब तहसीलदार विष्णू बुटे, सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवू....!

पाणंद रस्त्यासह गायरानातील अतिक्रमणासारखे अनेक प्रश्न गावागावांमध्ये आहेत. ज्या समस्या सहज सुटणाऱ्या आहेत, त्या तातडीने सोडवू. त्यानंतर एक-एक गाव घेऊन तेथील प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवूया, असेही पांगारकर यांनी सांगितले.

याकडे काळजीपूर्वक पहा...!

काही पाणंद रस्ते दोन किंवा तीन गावांना जोडलेले आहेत. शहरालगतच्या गावातील पाणंद रस्ते शहराशी किंवा मोठ्या रस्त्यांशी जोडले आहेत. असे रस्ते खुले करताना भविष्यकालीन वापर लक्षात घेऊन ते काळजीपूर्वक खुले करा, अशी सूचनाही पांगारकर यांनी केली.

--------

'लोकमत' इम्पॅक्ट..!

गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ८० पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यासाठी खास मोहीम राबविण्याची गरज आहे, असे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारी (दि. १२) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महसूल खात्याने महाराजस्व अभियानांतर्गत अतिक्रमित पाणंदी खुली करण्याची मोहीम आखली आहे. बुधवारी (दि. १७) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.

------

फोटो ओळी-

गडहिंग्लज येथील बैठकीत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, विष्णू बुटे, विद्याधर गुरबे उपस्थित होते.