शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन पार्कची गरज

By admin | Updated: May 10, 2017 21:10 IST

वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे

वृक्षांच्या माध्यमातून सावली मिळणे गरजेचे आहे. भविष्यात तापलेल्या शहरांमध्ये वृक्षलागवडीच्या माध्यमातून मोठा आॅक्सिजन पार्क उभा करण्याची गरज निर्माण होणार आहे. जिल्ह्यातही बांधाबांधावर चारीबाजूंनी वृक्षलागवड केल्यास शेतकऱ्यांची हद्दही निश्चित होईल आणि झाडाच्या सावलीखाली थोडी विश्रांतीही घेता येईल. कोल्हापुरात निसर्गमित्र संस्थेसारख्या काही संस्थेने जाणीवपूर्वक विविध उपक्रम आधीच सुरू केले आहेत. त्यांच्या एकेकट्या उपक्रमाला सामूहिक साथीची गरज आहे. दुर्मिळ वृक्षांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातून पर्यावरणाचाही समतोल साधता येईल.मोकळ्या जागी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणे, त्याची लॅण्ड बँक तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे. वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन दरवर्षी नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीनुसार काम करतात; पण या कामाला गती मिळत नाही. राज्य शासनाने जलयुक्त शिवारसारखा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर वृक्षलागवडीचा आणि तो जतन करण्यासाठीही विशेष उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन, नामफाउंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करावी. वृक्षलागवडीसाठी पुरेशी आणि दर्जेदार रोपे रोपवाटिकांमधून आणली पाहिजेत. रोप लागवडीची स्थळ निश्चिती करणे, खड्डे तयार करून त्यात खत टाकून ठेवणे, वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणे, रोप लावण्यासाठी लोकांना प्रेरित करून त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळविणे गरजेचे आहे. लावलेले वृक्ष जगले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे. वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जागोजागी वृक्षलागवडीने आॅक्सिजन पार्क तयार होतील.संदीप आडनाईक