शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नवसमाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृतीची जोपासना आवश्यक : चंद्रकांतदादा पाटील

By admin | Updated: June 4, 2017 20:18 IST

चिकोडे वाचनालयाच्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिक्षित व सुसंस्कृत नवसमाजनिर्मिर्तीसाठी वाचनसंस्कृतीची जोपासना महत्त्वाची आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी (दि. ३) येथे व्यक्त केले. जरगनगर येथील कै. भालचंद्र चिकोडे वाचनालयातर्फे सुरू केलेल्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, निर्मिर्ती अ‍ॅडव्हर्टायझिंगचे अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, अ‍ॅड. शिवप्रसाद पाटील, दिलीप बापट, उद्योगपती नरेश चंदवाणी, प्रवीण पाटील, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, दीपक शिरगावकर, आदी प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, समाजात वाचनसंस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने चिकोडे वाचनालयाच्या वतीने हाती घेतलेल्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ या उपक्रमाद्वारे समाजाला नवी दिशा मिळेल. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे समाजात वाचनसंस्कृती वाढीस लागेल, लहान मुलांना आपल्या घर व परिसरात पुस्तके उपलब्ध होतील, त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. राहुल चिकोडे यांनी स्वागत केले.

यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, वाचक व विद्यार्र्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील जरगनगर येथील कै. भालचंद्र चिकोडे वाचनालयातर्फे सुरू केलेल्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल चिकोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.