शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’ची गरज खेदजनक

By admin | Updated: August 9, 2016 01:12 IST

पालकमंत्र्यांचे परखड मत : प्रत्येकाने महिलांप्रती आदर बाळगावा; पथकाचा प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची निर्मिती पोलिस दलास करावी लागते ही बाब वेदनादायी व दु:ख निर्माण करणारी आहे, असे परखड मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने महिला व युवतींच्या वाढत्या छेडछाडीविरोधात निर्माण केलेल्या ‘निर्भया’ पथकाच्या प्रारंभप्रसंगी पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर होत्या. पालकमंत्री पाटील म्हणाले, हे पथक निर्मिती म्हणजे आपण माता- भगिनींची सुरक्षितता आणि महिलांची समानता मानत नसल्याचेच धोतक आहे. सध्याचे दिवस हे कलियुगातील शेवटच्या काळाचेच आहेत असे म्हणावे लागेल. आजच्या काळात पोलिस दलातील काही लोकही अशा कृत्यात सहभागी होतात. त्यांचीही गय होता कामा नये. ज्या पद्धतीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पथकाची रचना केली आहे, त्यात प्रबोधन, समुपदेशन आणि ज्यादाच काम लागले तर दंडुक्याचा वापर केला जाणार आहे. या पथकास पाच वाहने मागणीप्रमाणे दिली जातील. या छेडछाडीच्या मानसिकतेच्या मुळाशी जाऊन समूळ उच्चाटन करण्यासाठी जी हवी ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.विजया रहाटकर म्हणाल्या, घटना घडल्यानंतर सरकार अनेक उपाय करते. मात्र, घटना घडूच नये म्हणून उपाय योजना करणारे कोल्हापूर पोलिस दल एकमेव आहे. युवती, महिलांची छेडछाड वेळीच रोखली नाही तर मोठी घटना घडण्यास वेळ लागत नाही. म्हणून निर्भया पथकासारखा प्रयोग राज्यात सर्वत्र करावा. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, हैदराबाद येथील महिला सुरक्षा पथकाच्या धर्तीवर या पथकाची निर्मिती केली आहे. सध्या देशात २६ हजारांहून अधिक महिलांबाबतचे गुन्हे घडत आहेत, तर यात महाराष्ट्राचा क्रमांक चौथा लागतो. त्यामुळे या निर्भया पथकाची निर्मिती केली आहे. यात स्वत: पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत. प्रत्येक शाळा, कॉलेज, चौक, टपऱ्या, आदी ठिकाणी हे पथक कार्यरत राहील. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, रस्त्यावरील ही लढाई आता घराघरांत नेण्याची गरज आहे. कारण घरातील महिलांना भ्रूण स्त्री जातीचे असेल तर गर्भपात करायला भाग पाडले जाते. त्यामुळे त्यांनाही सुरक्षित करण्याची गरज आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामाणे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, मधुरिमाराजे छत्रपती, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, आदी मान्यवर उपस्थित होते. अशी कारवाई; असे समुपदेशनजिल्ह्यात दहा पथकांची निर्मिती केली आहे. कोल्हापूर शहरातील चार पोलिस ठाणे, इचलकरंजी (शहर, ग्रामीण) , जयसिंगपूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, कागल यांचा समावेश आहे. त्यात एक पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला कर्मचारी, तीन पुरुष कर्मचारी, एक चालक असे पथक आहे. हे पथक कॉलेज, शाळा, नोकरी, आस्थापना, चौक, टपरी, गर्दीच्या ठिकाणी टेहळणी करणार आहे. त्यांच्या साथीला छुपे कॅमेरे दिले आहेत. छेडछाड करणाऱ्यास प्रथम ताब्यात घेऊन त्याची विहीत नमुन्यात माहिती व छायाचित्र घेतले जाणार आहे. मुलगा अज्ञान असेल तर त्याच्या आई-वडिलांना बोलावून समुपदेशन, प्रबोधन केले जाणार आहे. तरुण असेल तर त्याला पालकांसमोर बोलावून प्रथम प्रबोधन केले जाणार आहे. दुसऱ्यांदा दंडुक्याचा वापर केला जाणार आहे. विवाहित तरुण असेल तर त्याच्या पत्नीला पोलिस ठाण्यात बोलावून त्याचे कृत्य सांगितले जाणार आहे. याशिवाय पत्नीसमोरच समुपदेशन केले जाणार आहे. स्वत: यात पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत.