शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराला स्वायत्तता देणे काळाची गरज : ओऊळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:48 IST

कोल्हापूर : सहकारामध्ये आता बºयापैकी स्वयंशिस्त आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवस्थापनात चांगली सुधारणा होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सहकारामध्ये आता बºयापैकी स्वयंशिस्त आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवस्थापनात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीने सहकार हा आता जनतेचा मूलभूत हक्क असून बँकांमधील स्पर्धेच्या युगात सहकाराला प्रगतिपथावर नेऊन, टिकवायचा असेल तर त्याला स्वायत्तता देण्याची गरज आहे, असे मत सहकार खात्याचे निवृत्त अप्पर आयुक्त व निबंधक दिनेश ओऊळकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

महाराष्टÑ राज्य सहकारी संघाच्या शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे कोल्हापूर येथे पाच जिल्'ांतील नागरी सहकारी बँकांच्या संचालक व पदाधिकाºयांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी राज्य सहकारी संघाचे अप्पर निबंधक उत्तमराव इंदलकर, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, राज्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील, मुख्याधिकारी एस. एस. बोडके, असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी, आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यशाळेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्'ांतील नागरी सहकारी बँकांचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.ओऊळकर म्हणाले, बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टद्वारे रिझर्व बँक सहकारी बँकांवर संपूर्ण नियंत्रण आणू पाहत आहे. सहकारी बँका त्यांना कमी करावयाच्या आहेत, असे असले तरी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सर्वसामान्यांसाठी बँका चांगले काम करत आहेत, असा सकारात्मक अहवाल दिला आहे.यावेळी निपुण कोरे, उत्तमराव इंदलकर, अरुण काकडे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. प्रतापराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. शंकर मांगलेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शिंदे यांनी आभार मानले.यावेळी असोसिएशनचे संचालक राजेंद्र जाधव, अरुण आलासे, शिरिष कणेरकर, सूर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, दत्तात्रय थोरावडे, दत्तात्रय राऊत, विश्वास चौगले आदी उपस्थित होते.