शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘दक्षिण’मध्ये राष्ट्रवादीचाच प्रचार

By admin | Updated: September 29, 2014 01:16 IST

धनंजय महाडिक : आघाडी तुटल्याने धर्मसंकट उभारल्याची कबुली

कोल्हापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार दुर्वास कदम यांचाच प्रचार करणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने आपल्यासमोर धर्मसंकट उभे राहिल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार महाडिक म्हणाले, गेल्या १५ वर्षांची दोन्ही कॉँग्रेसची आघाडी तुटली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष स्वतंत्र लढत आहेत. लोकसभा निवडणूक दोन्ही कॉँग्रेसने एकसंधपणे लढली होती. आता स्वतंत्र लढत असल्याने आपल्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने दुर्वास कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कदम यांच्याबरोबरच आपण राहणार आहे. आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसवर परिणाम होईल, असे वाटत नसल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले. अमल महाडिक हे माझे चुलत बंधू जरी असले, तरी त्यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे. आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांची व माझी वेगळी भूमिका असू शकते, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. आबिटकर... आव्हान नव्हेच शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तिप्रदर्शनाबाबत विचारणा केली असता, तुम्ही माझे शक्तिप्रदर्शन पाहिले नसल्याने असे विचारत आहात. आबिटकरांचे विचाराल तर ते माझ्यासमोर आव्हान नाहीत, अशी खिल्ली आमदार के. पी. पाटील यांनी उडविली.