शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शीतयुद्ध पुन्हा चव्हाट्यावर

By admin | Updated: September 20, 2016 00:44 IST

कार्यकर्त्यांत अस्वस्थता : धनंजय महाडिक यांंच्या ‘टॉप थ्री’चे पक्षाला कौतुक नाही

कोल्हापूर : गेल्या दीड-दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध चव्हाट्यावर आले आहे. नेत्यांमध्ये सरळसरळ दोन गट पडले असून, पक्षाच्या कार्यक्रमाला एकमेकांना डावलले जात असल्याने कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्काराला त्याच पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी अनुपस्थित राहणे हे त्याच शीतयुद्धाचा भाग आहे. सर्वच राजकीय पक्षांना अंतर्गत कुरघोड्या काही नवीन नाहीत; पण त्या मर्यादित ठेवल्या तरच बरे, अन्यथा त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते, हा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच नेते ताकदीने बाहेर पडल्याने देशातील लाट कोल्हापुरात परतवून लावण्याची किमया झाली. आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते झपाटल्यासारखे राबले आणि यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या वाढत गेल्या. महापालिका निवडणुकीत तर खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यातील मतभेद टोकाला गेले. ते कमी की काय, तोपर्यंत शहरात दोन गट झाले. त्यानंतर एकमेकांना डावलण्याचे राजकारण सुरू झाले. त्यातूनच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झालेल्या ‘युथ केडर’च्या कार्यक्रमाला जिल्हा नेतृत्वाने काही नेत्यांना उशिरा निमंत्रण दिले. त्यामुळे या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पक्षांतर्गत शीतयुद्ध प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर त्यांनी अनुपस्थित नेत्यांना फोन करून चौकशी केली. इचलकरंजीतील राजकारणात जिल्हा नेतृत्वाने हस्तक्षेप केला. त्यातून उठलेले वादंग अजून शांत व्हायचे आहे, तोपर्यंत रविवारी नितीन पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ठिणगी पडली. पाटील यांनी ‘टॉप थ्री’ सन्मान झाल्याबद्दल खासदार महाडिक, तर ‘कागल’ व ‘मुरगूड’ नगरपालिका देशात आदर्श ठरल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांचा सत्कार ठेवला होता. यासाठी राष्ट्रवादीच्या शहर व जिल्हा नेत्यांना बोलविले होते; पण कोल्हापुरात असताना मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. एवढेच नव्हे, तर शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही दांडी मारली. यामुळे संतप्त झालेल्या नितीन पाटील यांनी थेट निषेध नोंदवत संताप व्यक्त केला. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील शीतयुद्धाने उसळी घेतल्याने पक्षाचे नुकसान होणार हे निश्चित आहे. मुळात तीन तालुक्यांचा पक्ष म्हणून विरोधक राष्ट्रवादीला हिणवत असताना नेते मात्र एकमेकाचा काटा काढण्यातच मग्न असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अंहं...कागल-मुरगूड देशात पुढेकागल-मुरगूड नगरपालिका स्वच्छतेत देशात पहिल्या आल्यावर अंहं...कागल-मुरगूड नगरपालिका देशात पुढे म्हणून आमदार मुश्रीफ यांचे कौतुक करणारे डिजिटल फलक शहरभर लागले. परंतु, त्याच पक्षाचे खासदार ‘टॉप थ्री’मध्ये आलेल्याचे मात्र पक्षाला कौतुक नाही. उलट पक्षाचेच नेते खासगीत त्याबद्दल कुचेष्टेने बोलतात. खासदार झाल्यावर संभाजीराजे यांचा महिन्यात सर्वपक्षीय नागरी सत्कार झाला; परंतु महाडिक यांचा मात्र तसा गौरव होऊ शकला नाही, यामागेही हा पक्षांतर्गत वादच कारणीभूत आहे.