शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

‘उत्तर’मधून राष्ट्रवादीतर्फे देवणे, खाडे, वालावलकर इच्छुक

By admin | Updated: August 19, 2014 00:38 IST

उद्या यादी प्रदेशकडे : जिल्हयातील दहा मतदारसंघांत २७ इच्छुक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे २७ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. सर्वाधिक मागणी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून असून यामधून महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, माजी उपमहापौर संभाजी देवणे, मंजिरी वालावलकर यांच्यासह पाचजण इच्छुक आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छुकांकडून अधिकृत उमेदवारी मागणी करण्याचे आदेश पक्षाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातून विविध मतदारसंघांतून ४२ इच्छुकांनी अर्ज नेले होते. हे अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आजअखेर दहा मतदारसंघांतून २७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून, तर सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी एक कागल व राधानगरी मतदारसंघातून दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)महाडिक यांची भूमिका सावध!राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे इच्छुकांकडून उमेदवारी मागणी अर्ज मागवण्यात आले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर उत्तर व दक्षिणमधून अर्ज नेले होते, पण आज सायंकाळी आठपर्यंत त्यांच्याकडून मागणी अर्ज दाखल केले नव्हते. उमेदवारीबाबत खासदार महाडिक यांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. संध्यादेवी, नंदातार्इंचा अर्ज मुंबईत?चंदगड मतदारसंघातून संग्रामसिंह कुपेकर व मोहन कांबळे यांनी पक्षाचा मागणी अर्ज दाखल केला आहे, पण विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर व नंदाताई बाभूळकर यांनी आज सायंकाळपर्यंत पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपला मागणी अर्ज दाखल केलेला नाही. त्या मुंबई येथे प्रदेश कार्यालयाकडे दाखल करणार असल्याचे समजते. यांनी केली पक्षाकडे उमेदवारीची मागणी -कागल- हसन मुश्रीफराधानगरी- के. पी. पाटीलशाहूवाडी- बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, रणवीरसिंग गायकवाडशिरोळ- राजेंद्र पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धैर्यशील माने, अशोकराव माने.इचलकरंजी - अशोकराव जांभळे, रवींद्र माने, मदन कारंडे.चंदगड- संग्रामसिंह कुपेकर, मोहन कांबळे.करवीर- धैर्यशील पाटील-कौलवकर, प्रदीप पाटील.हातकणंगले- भास्करराव शेटे, अशोकराव माने, अनिल कांबळे.कोल्हापूर उत्तर- आर. के. पोवार, संगीता खाडे, संभाजी देवणे, अशोकराव साळोखे, मंजिरी मदन वालावलकर. कोल्हापूर दक्षिण - प्रताप कोंडेकर, टी. बी. पाटील, हेमंत पाटील.