राम मगदूम -- गडहिंग्लज --शिवसेना व भाजप सोडून कुणाशीही युती होऊ शकते, या स्पष्टीकरणातच संभाव्य युती कुणाशी याचे उत्तर दडले आहे. किंबहुना, गडहिंग्लज साखर कारखान्यातील जनता दल-राष्ट्रवादीची युती गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीतही कायम राहील, असाच संकेत आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची गडहिंग्लज पालिकेच्या राजकारणातील आगामी वाटचाल जनता दलाबरोबरच राहील, हे देखील स्पष्ट होते.गेल्या चार दशकांतील नगरपालिकेच्या राजकारणाचा वेध घेतल्यास काँग्रेसचे माजी आमदार डॉॅ. घाळी यांच्या कारकिर्दीनंतर अपवाद वगळता गडहिंग्लज शहरावर जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांचेच प्रभुत्व राहिल्याचे दिसून येते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब कुपेकर यांनी दोन वेळा, तर गेल्यावेळी कुपेकरांच्या सहकार्याने मुश्रीफ यांनीही केला. मात्र, मिळालेली सत्ता त्यांना अबाधित ठेवता आली नाही. १९९१ मध्ये राजर्षी शाहू आघाडी आणि २००१ मध्ये श्री महालक्ष्मी आघाडीच्या माध्यमातून जनता दलातील ‘नाराज’ मंडळींना सोबत घेऊन कुपेकरांनी पालिकेची सत्ता काबीज केली. या दोन्ही आघाड्यांच्या ‘कर्तबगारी’ व ‘कामगिरी’मुळेच त्यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना पुढील निवडणुकीत नागारिकांनी नाकारले. त्यामुळेच त्यांनी त्यानंतर ‘म्युन्सिपाल्टी’च्या राजकारणात फारसा रस घेतला नाही. २०११ मध्ये कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या गडहिंग्लज पालिकेची पहिली निवडणूक मुश्रीफ यांनी कुपेकरांच्या मदतीने ताकदीने लढविली आणि सत्ता काबीजही केली; मात्र नगरसेवकांमधील अंतर्गत मतभेद व कुरघोडीमुळेच साडेतीन वर्षांतच राष्ट्रवादीला पालिकेच्या सत्तेवर पाणी सोडावे लागले. किंबहुना, गडहिंग्लज शहरातील राजकारणाचा कुपेकरांनी घेतलेल्या अनुभवाचा प्रत्यय मुश्रीफ यांनाही आला. या पार्श्वभूमीवर त्यांनी कारखान्यातील युती पालिकेतही कायम ठेवली तर आश्चर्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यापेक्षा शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिकांना गडहिंग्लज शहरातून मिळालेले १९०० चे मताधिक्य आणि विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्यापेक्षा संजय घाटगेंना मिळालेले ८०० चे मताधिक्य. या दोन्ही निवडणुकीत शिंदेंचे कार्यकर्ते व समर्थक मुश्रीफ यांच्या विरोधात होते. आगामी विधानसभा निवडणुकीत चंदगड व कागलमध्ये राष्ट्रवादीला जनता दलाकडून मदतीची अपेक्षा. नगरपालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी ज. द. व जनसुराज्य यांच्यात अंतर्गत कुरघोडी होऊनही जनता दलास मिळालेल्या सात जागा, शिंदेंचा शहरावरील प्रभाव आणि कारखान्यातील ‘राजकारण’
‘राष्ट्रवादी’ची युती ‘जनता दला’बरोबरच
By admin | Updated: July 5, 2016 00:03 IST