शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिकरीत्या संवर्धित अंबाबाईची एकमेव मूर्ती

By admin | Updated: August 2, 2015 01:19 IST

वसंत शिंदे यांची माहिती : भारतातील पहिलाच प्रयोग; दररोज १३ तास संवर्धन

कोल्हापूर : बिब्बा, बेहडा, दूर्वांचा रस, चंदन अशा नैसर्गिक साधनांपासून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम करण्यात आले असून, हा भारतातील पहिला प्रयोग असल्याची माहिती डेक्कन कॉलेज, पुणेच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाईची ही मूर्ती ११व्या शतकातील असून, या संवर्धनामुळे ती अधिकच सुंदर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या सात अधिकाऱ्यांनी रोज १३ तास मूर्ती संवर्धनाचे काम केले आहे. आज, रविवारी संध्याकाळी ते पंढरपूरला रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ वसंत शिंदे यांनी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मूर्तीसंबंधी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, भारतातील मूर्तींना पाश्चात्त्य पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून केमिकल कॉन्झर्वेशन केले जाते. या पद्धतीमध्ये रसायनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पाच-दहा वर्षांनी मूर्ती अधिकच खराब होत जाते. भारताच्या स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्राच्या ग्रंथांमध्ये मूर्ती संवर्धनाची खूप माहिती आहे, ज्यात विशिष्ट वनस्पती, फुले-पानांचा रस यांच्या लेपांची माहिती आहे. त्या आधारे अधिकारी मनेजर सिंग यांनी भारतीय ग्रंथांचा अभ्यास करून, या नैसर्गिक साधनांचा वापर करीत अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम केले आहे. हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. या संवर्धनासाठी बिब्बा, बेहड्याचा अर्क, दूर्वांचा रस, चंदनाची पूड, गाईच्या तुपापासून बनविलेले अंजन (काजळ) वापरण्यात आले आहे. त्यातही बिब्बा आणि बेहड्याच्या अर्काचे तीन वेळा आणि दुर्वांच्या रसाचे दोन वेळा कोटिंग केले आहे. या लेपाने मूर्तीचे कोणतेही नुकसान होणार नाही. हा प्रयोेग किती यशस्वी झाला आहे, हे पाहण्यासाठी दर सहा महिन्यांनी आम्ही मूर्तीची पाहणी-निरीक्षण करणार आहोत. मूर्तीसह मंदिराचेही संवर्धन व्हावे देवीची ही मूर्ती कमीत कमी ११ व्या शतकातील असून, अजूनही तिची स्थिती चांगली आहे. मंदिरदेखील त्याच कालावधीतील आहे. सध्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर, जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर अशा मंदिरांचे संवर्धन आमच्यावतीने केले जात आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीबरोबरच मंदिराचेही संवर्धन व्हायला हवे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच मूर्तीचा अभ्यासही व्हायला हवा. मूर्तीचे मूळ सौंदर्य खुलले शिंदे म्हणाले, अंबाबाई मूर्तीवर यापूर्वी केलेला वज्रलेप चुकीच्या पद्धतीचा होता. तो निघताना लावलेले एमसील, पितळी पट्ट्यांमुळे अतिरिक्त वजन पडले होते. हे सगळे प्रकार मूर्तीवरून काढले. त्यामुळे मूळ मूर्ती प्रकाशात आली. आम्ही केलेल्या संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीची झीज भरून निघाली.