शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार निलंबन कारवाई विरोधात उद्या इंडिया आघाडीच्यावतीने देशभर निदर्शने

By विश्वास पाटील | Updated: December 21, 2023 15:06 IST

महाराष्ट्रातील सर्व प्रागतिक पक्ष निदर्शनात सहभागी होणार 

कोल्हापूर - खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाई मधून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी देशात सर्वत्र निदर्शने करण्याची हाक दिली आहे. प्रागतिक पक्षांच्या आघाडीमधील सर्व घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी आपापल्या भागातील निदर्शनामध्ये संपूर्ण शक्तीनिशी सहभागी व्हावे. शक्य व आवश्यक असेल, तेथे पुढाकार घ्यावा. तसेच इंडिया आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यासह एकत्रित निदर्शने करण्यात यावीत असे प्रागतिक पक्षांच्या आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले. या आघाडीच्यावतीने प्रा. एस व्ही जाधव, प्रताप होगाडे, ॲड.डॉ. सुरेश माने, उदय नारकर यांनी ही माहिती दिली.

निलंबित खासदारांवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेतून एकूण 95 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर 46 सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे...

संसदेच्या कामकाजानंतर इंडिया आघाडीने शुक्रवारी देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार शक्य त्या सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात यावीत असे आवाहन प्रागतिक पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.                                                                      या आंदोलनात खालील प्रागतिक पक्ष  सहभागी होत आहेत. 

शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी, श्रमिक मुक्ती दल.