शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी युवक’चे उद्या टोलविरोधी आंदोलन

By admin | Updated: March 23, 2015 00:38 IST

शहरातील टोलनाके बंद पाडणार : आदिल फरास

कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे अनेक प्रकारे आंदोलन करूनही शहरातील टोल ‘जैसे थे’ आहे. भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांत ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा केली होती. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी युवक प्रदेशतर्फे राज्यातील सर्व टोल नाके मंगळवारी (दि.२४) एक दिवस बंद करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व टोल नाके यादिवशी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत बंद केले जाणार आहेत. या आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी रविवारी शहर युवक राष्ट्रवादी कमिटीच्या बैठकीत केले.केंद्र व राज्य शासनाने निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही तसेच निवडणुकीत टोलमुक्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक प्रदेशतर्फे राज्यव्यापी ‘टोल बंद’चे आंदोलन हाती घेतले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवकचे शहर अध्यक्ष व स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंगळवारी अत्यंत तीव्रपणे आंदोलन करत शहरातील सर्व टोलनाके बंद करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व नऊ टोल नाके बंद करून त्याठिकाणी आंदोलन करण्याची जबाबदारी वाटप करण्यात आली. आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केल्यास ‘जशास-तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशाराही फरास यांनी दिला.यावेळी अमित डोंगरसाने, प्रदीप पाटील, युवराज साळोखे, अमित पाटील, योगेश इंगवले, जाफर मलबारी, हंबीरराव पाटील, सुनील परिट, नितीन मस्के, नीलेश सूर्यवंशी, मंदार पावस्कर, राणोजी चव्हाण, उत्तम बिरांजे, संदीप चौगले, सचिन नवले, सचिन वेर्णेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)