कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्ष आघाडीने महानगरपालिका निवडणुकीसाठी ४१ उमेदवारांची आपली पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. विद्यमान नगरसेवक व त्यांच्या कुटुंबातील मिळून तब्बल २० जणांना या यादीत स्थान मिळाले आहे. पक्षाचे कारभारी नगरसेवक आदिल फरास व निष्ठावंत कार्यकर्ते निरंजन कदम यांना उमेदवारी नाकारली आहे, तर राजेश लाटकर व त्यांच्या पत्नी सूरमंजिरी यांना दोन वेगवेगळ्या मतदार- संघांतून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन माजी महापौरांच्या पत्नींना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेत शुक्रवारी पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘जनसुराज्य’चे प्रवक्ते प्रा. जयंत पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी ही यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. राष्ट्रवादीच्या उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, माजी महापौर कादंबरी कवाळे यांच्यासह चार नगरसेविकांचे पती आता निवडणूक लढविणार आहेत. (प्रतिनिधी) प्र.क्र.प्रभागाचे नावउमेदवाराचे नाव २.कसबा बावडा पूर्व बाजूप्रशांत जयवंतराव पाटील ८.भोसलेवाडी कदमवाडीमकरंद जोंधळे ९.कदमवाडीआरती अनिल आवळे१०.शाहू कॉलेजअॅड. सूरमंजरी राजेश लाटकर११.ताराबाई पार्कचंद्रकांत शिवाजीराव राऊत १२.नागाळा पार्कराजेश दिलीप करंदीकर १६.शिवाजी पार्कराजेश भरत लाटकर १७सदर बाजारस्नेहल महेश जाधव २३.रुईकर कॉलनीजयश्री प्रकाश पाटील २६.कॉमर्स कॉलेजभाग्यरेखा रवींद्र पाटील २७.ट्रेझरी आॅफिससंगीता रमेश पोवार २८.सिद्धार्थनगरअफजल कुतबुद्दिन पिरजादे २९.शिपुगडे तालीमसरिता नंदकुमार मोरे ३१.बाजारगेटसुवर्णा विश्वानाथ सांगावकर३२.बिंदू चौक बाळकृष्ण बाबासो मेढे-पवार ३३.महालक्ष्मी मंदिरहसीना बाबू फरास ३४.शिवाजी उद्यमनगरविनायक विलासराव फाळके३६.राजारामपुरीसंदीप शिवाजीराव कवाळे ३७.राजारामपुरी पाटणे हायस्कूलदीपिका दीपक जाधव३८.टाकाळा खण माळी कॉळनीअश्विनी अनिल कदम ३९.राजारामपुरी एक्स्टेंशनमुरलीधर पांडुरंग जाधव ४२.पांजरपोळसुवर्णा वसंत कोगेकर ४५.कै लासगडची स्वारी मंदिरसंभाजी यशवंत देवणे ४७.फिरंगाईअर्चना विजय साळोखे ४९.रंकाळा स्टॅँड दिलीप जयसिंगराव माने५०.पंचगंगा तालीम माधवी प्रकाश गवंडी ५१.लक्षतीर्थ वसाहतअनुराधा सचिन खेडकर ५३.दुधाळी पॅव्हेलियनविश्वास बाबूराव आयरेकर ५४.चंद्रेश्वरसुनीता परिक्षीत पन्हाळकर ५५.पद्माराजे उद्यानअजिंक्य शिवाजीराव चव्हाण ५६.संभाजीनगर बसस्थानकमहेश आबासो सावंत ५७.नाथागोळे तालीमयुवराज बाजीराव साळोखे ६०.जवाहरनगर सुहास हणमंत सोरटे ६५.राजेंद्रनगर मुस्ताक मुसा मलबारी ६७.रामानंदनगर जरगनगरसुनील सावजी पाटील६८.कळंबा फिल्टर हाऊसअलका दिनकर कांबळे ६९.तपोवन प्रमोद धोंडिराम पोवार७२फुलेवाडीमाधवी मानसिंग पाटील ७५.आपटेनगर-तुळजाभवानीगौरव राजन सावंत ७७शासकीय मध्यवर्ती कारागृहअश्विनी सतीश लोळगे ७९.सुर्वेनगरमेघा अविनाश पाटील जिल्हाध्यक्षांची सून लढणार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सून मेघा अविनाश पाटील यांना सुर्वेनगर प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील हे मूळचे सोळांकूर (ता.राधानगरी) येथील रहिवाशी आहेत. मात्र, त्यांचे पुत्र अविनाश हे गेल्या पंधरा वर्षांपासून सुर्वेनगरात राहत असल्याचे सांगण्यात आले. आठ उमेदवार ‘जनसुराज्य’चे शुक्रवारी जाहीर झालेल्या ४१ उमेदवारांमध्ये ३३ उमेदवार हे राष्ट्रवादीचे, तर ८ उमेदवार हे जनसुराज्य पक्षाचे असल्याचे सांगण्यात आले; परंतु ‘जनसुराज्य’चे उमेदवार कोण, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. आघाडीचे सर्व उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे यावेळी प्रा. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आघाडीने ८१ प्रभागांत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित ४० प्रभागांतील उमेदवारांची यादी येत्या चार-पाच दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आदिल फरास यांना धक्का पक्षाचे एक ‘प्रमुख नगरसेवक’ अशी ओळख असलेल्या आदिल फरास यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते अडचणीत आले आहे. उमेदवारी नाकारल्याचे समजताच प्रचंड नाराज झाल्याने ते शुक्रवारी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. फरास यांना हा धक्काच आहे; परंतु त्यांच्या आई आणि माजी महापौर बाबू फरास यांच्या पत्नी हसीना फरास यांना मात्र महालक्ष्मी मंदिर प्रभागातून पक्षाने उमेदवारी दिली आहे. आदिल फरास यांना डावलून बिंदू चौक प्रभागातून बाळकृष्ण मेढे यांना ‘स्थानिक उमेदवार’ या निकषावर उमेदवारी देण्यात आली.
‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी २० विद्यमानांच्या घरात
By admin | Updated: September 26, 2015 00:38 IST