शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

जिल्ह्यातील दोन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन

By admin | Updated: May 17, 2016 01:13 IST

राज्यातील पहिला जिल्हा : ‘इस्पुर्ली’, ‘सरवडे’चा समावेश; दर्जेदार आरोग्यसेवेवर शिक्कामोर्तब

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -जिल्ह्यातील इस्पुर्ली (ता. करवीर), सरवडे (ता. राधानगरी) प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. आतापर्यंत राष्ट्रीय मानांकन मिळविलेली राज्यातील ही पहिली दोन आरोग्य केंद्रे ठरली आहेत. सन २००६ पासून देशात दहा आरोग्य केंद्रांना मानांकन मिळाले आहे. यंदा महाराष्ट्रातील या दोन आरोग्य केंद्रांचा मानांकनाच्या यादीत समावेश झाला आहे. जिल्ह्यात एकूण ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रातून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा आणि सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद नेहमी प्रयत्नशील असते. लोकसहभागातून ६८ केंद्रांचा (पान १० वर)गुजरातनंतर कोल्हापूरसन २००६ ते २०१५ अखेर गुजरातमधील दाभोडा (जि. गांधीनगर), खिरासरा (राजकोट), हरियोल (साबरकंठा), टंकाल, कंडोलपाडा (नौसारी), खेरवा (मेहसाना), ओरना (सूरत), तर हरियाणामधील भाडसोन (कर्नाळ), भागल (कैथाल) या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील करूणा ट्रस्टच्या रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. सन २०१६-१७ वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली, सरवडे या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन मिळाले आहे. सन २००९ ते २०१० मध्ये गुजरातमधील एकाच जिल्ह्यातील दोन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले. त्यानंतर एकाच जिल्ह्यात दोन केंद्रांचा राष्ट्रीय मानांकनाचा मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे.