शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेस प्रारंभ

By admin | Updated: April 22, 2015 00:54 IST

मॅटचा पहिल्यांदाच प्रयोग : देशातील तीस संघ सहभागी; विद्युतझोतात होणार सामने

सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथे राष्ट्रीय खो-खो स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला. देशभरातील तीस संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मॅटवर विद्युतझोतात सामने घेण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मदन पाटील होते. यावेळी रामराजे म्हणाले, खो-खो हा जुना मैदानी खेळ आहे. तो जपला पाहिजे. पुढील वर्षी फलटणमध्ये अशीच भव्य स्पर्धा घेतली जाईल.  मदन पाटील म्हणाले, सांगलीला खेळांची परंपरा आहे. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या क्रीडावैभवात भर घातली आहे. उद्घाटनप्रसंगी धनगरी ढोल, नृत्याविष्कार व जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके झाली. देशभरातून आलेल्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली. मानवंदना देण्यासाठी आलेल्या संघांचे नेतृत्व देवाप्पा चिपरीकर व डॉ. सुहास व्हटकर यांनी केले. नगरसेवक गजानन मगदूम यांनी स्वागत केले, विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, माजी आ. प्रा. शरद पाटील, खो-खो फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव सुरेश शर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, संजय भोकरे, दीपक सूर्यवंशी, प्रा. जहाँगीर तांबोळी, प्राचार्य एन. एम. भैरट, माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. भारतीय खो-खो महासंघ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने शिवप्रेमी मंडळाने २६वी राष्ट्रीय किशोर-किशोरी आणि २५वी राष्ट्रीय पुरुष महिला फेडरेशन महापौर चषक या स्पर्धेचे आयोजन केले आहे. २५ एप्रिलपर्यंत कुपवाडमधील अकुज ड्रिमलॅण्ड मैदानावर ही स्पर्धा होईल. (वार्ताहर)