शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’

By admin | Updated: May 5, 2016 00:23 IST

खरसुंडी यात्रेत गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण आज रथोत्सव : सासनकाठ्या, पालखी सोहळा उत्साहात

खरसुंडी : महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांतील अनेक घराण्यांचे कुलदैवत असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिध्दनाथाच्या चैत्री यात्रेत बुधवारी पालखी आणि सासनकाठ्यांचा सोहळा उदंड उत्साहात पार पडला. यावेळी गुलाल-खोबऱ्यांची मुक्त उधळण करण्यात आली. दिवसभर रणरणत्या उन्हात ‘नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात भाविकांनी श्रींचे भक्तीभावाने दर्शन घेतले. श्री सिध्दनाथाची चैत्री यात्रेतील बुधवारी मुख्य दिवस होता. नाथनगरीतील सासनकाठ्यांच्या सोहळ्यास लाखो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी मंदिर परिसरात विविध गावच्या मानाच्या सासनकाठ्या पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत दाखल झाल्या. दुपारी आटपाडीचे मानकरी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते पूजन करून श्रींची पालखी आणि सासनकाठ्यांचे मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. पालखी व सासनकाठ्यांवर भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करून नवस फेडले. अग्रभागी धूप आरती, भालदार-चोपदार, छत्रसेवेकरी मानकरी, ‘श्रीं’ची सजवलेली उत्सवमूर्ती, पालखी असा शाही लवाजमा मंदिरातून बाहेर येताच भाविकांकडून गुलाल-खोबऱ्याची पुन्हा अखंड उधळण झाली. पालखी मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे आली. सर्व सासनकाठ्या पालखीला भेटवून मानवंदना देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी व मानपानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पुन्हा श्रीनाथ मंदिराकडे आली. यंदा खरसुंडीत गुलाल-खोबऱ्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, महसूल प्रशासन, पोलिसांनी प्रयत्न केले. गुरुवारी रथोत्सव सोहळा पार पडणार आहे.यंदा कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, देवस्थान समिती यांच्याकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यात्रेत वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)