करंजफेण : स्वच्छता ही सेवा जिल्हा परिषद अभियानांतर्गत नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे ग्रामपंचायत महिला पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आली. ही मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
ग्रामदैवत हनुमान मंदिर परिसरातील कचरा, तसेच गावातील गल्लीबोळांतील कचरा साफ करण्याच्या मोहिमेची यावेळी सुरुवात करण्यात आली. महिलांनी एकजुटीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी पन्हाळा पंचायत समिती उपसभापती रश्मी कांबळे, सरपंच वंदना पाटील, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील, रेखा बाऊचकर, ग्रामसेविका सुप्रिया खोत, तसेच कर्मचारी सुभाष गोसावी उपस्थित होते.
फोटो ओळ : नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपसभापती रश्मी कांबळे, सरपंच वंदना पाटील, तसेच सदस्या उपस्थित होत्या.