शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नंदवाळ येथील वारीची तयारी पूर्ण

By admin | Updated: July 3, 2017 00:46 IST

नंदवाळ येथील वारीची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कसडोली (खालसा) : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणारे करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठलाची आषाढी एकादशी वारी यात्रा उद्या, मंगळवारी होत असून, या वारी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच सरिता पाटील, जोतीराम पाटील यांनी दिली. या यात्रेदिवशी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास व गावात डिजिटल फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहेनंदवाळ येथे प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या सुरेख मूर्ती आहेत. हेमाडपंथीय मंदिर पुरातन काळापासून आहे. या मंदिरात प्रतिवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. वारीला सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहत असल्याने प्रचंड गर्दी होते. याचा ताण प्रशासनावर पडतो. याचा विचार करून स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत नंदवाळ व करवीर पोलीस यांच्यावतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती यात्रा कमिटीच्या सदस्यांनी दिली.यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन रांग स्वतंत्र निर्माण केली असून, मुखदर्शनासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. भाविकांनी आपली वाहने हजारे पेट्रोल पंप आणि वाशी खत कारखाना येथे उभा करून वाशी ते नंदवाळ असा पायी प्रवास करावयाचा आहे. भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे भाविकांना सोयी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी कमी पडतो, तरीही ग्रामपंचायतीच्या कुवतीप्रमाणे खर्च करून भाविकांची सोय केली जाते. तरी यात्रा चांगली व सुविधा मिळण्यासाठी आर्थिक मदत प्रशासनाने करावी, अशी मागणी पंचायतीच्या वतीने करण्यात आली.करवीर पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, यात्रा महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे भक्तिमय वातावरणात संपन्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुशोभीकरण, सफाई, नंदवाळमधील गटारी साफ करण्यात आल्या आहेत; तसेच पाणी शुद्धिकरण करण्यात आले आहे. आरोग्य पथक २४ तास कार्यरत राहणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत, देवस्थान कमिटीने केले आहे.