शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

शकुनीमामाच्या जिवावर ‘नाना’ची दादागिरी

By admin | Updated: May 9, 2017 01:06 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा पलटवार : थेट पाईप लाईनप्रकरणी आरोप-प्रत्यारोप

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिरोलीच्या शकुनीमामाच्या जिवावर दादागिरी करणाऱ्या ‘नाना’ने भाजपच्या चमचेगिरीचेसुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे का? असा सवाल करीत याच शकुनीमामाच्या आदेशानुसार थेट पाईपलाईन योजनेच्या कामात दुर्योधनरूपी नाना जाणीवपूर्वक खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे सोमवारी केला. सत्यजित कदम यांच्यासह माजी आमदार महादेवराव महडिक यांनाही टार्गेट करीत या शकुनीमामा आणि कंपनीस कोल्हापूरला लुटणे आणि भानगडीची परंपराच असल्याचे पत्रकात म्हटले आहे. थेट पाईपलाईनमधील भ्रष्टाचाराचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाने महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे. कदम यांनी स्वत: आरोप केले असले तरी त्याला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. तथापि, महापौर हसिना फरास यांनी यातून भाग काढून घेतला असल्याचे दिसत आहे. कारण सोमवारी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकारवरही त्यांची सही नाही. माजी आमदार महाडिक यांना या वादात ओढण्यात आले आहे. शिरोलीकर शकुनीमामाने गेल्या अठरा वर्र्षांत आमदार असताना कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले, याचा हिशोब देण्यासाठी स्वत: कोणत्याही चौकात चर्चेला यावे व त्याची तारीख त्यांनीच लवकर जाहीर करावी, असे आव्हानही पत्रकात देण्यात आले आहे. ‘नाना’चे कोणतेही तांत्रिक शिक्षण पूर्ण नसताना कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात वेगवेगळी कॉँट्रॅक्ट घेऊन तुंबड्या भरल्या. भालकर नावाच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर डल्ला मारला. कॉँट्रॅक्ट व्यवसायाबरोबरच भाजपमधील निष्ठावंतांना बाद करणे, भाजपची चमचेगिरी करणे, विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करून हुजरेगिरीचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा उद्योग सुरूकेला आहे, असे नमूद करून पत्रकात पुढे म्हटले आहे की, दुसऱ्यांना लुटारू म्हणणाऱ्या ‘नाना’च्या शकुनीमामानेच शेतकऱ्यांच्या घामाच्या जोरावर नावारूपास आलेल्या ‘गोकु ळ’मध्ये कित्तेक वर्षे डल्ला मारण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे. मलईची लुटमार करीत स्वत: श्रीमंत झाले. पुतण्याच्या बांधकाम व्यवसायासाठी दडपशाहीने मोक्याच्या जागा हडप केल्या. टोल संस्कृती महाडिक कंपनीनेच प्रथम आणली. पेट्रोल पंपावरील गोळीबार, नाफ्ता भेसळ, मटका अड्ड्यावरील छाप्यात झालेली अटक, विकासवाडी येथील धाब्यावरील वेश्या अड्ड्यावर पडलेली धाड, जकात चुकवून आणताना पकडलेली चांदी, अंडी भ्रष्टाचार प्रकरण ही शकुनीमामाच्या व नातेवाइकांच्या कर्तृत्वाची उदाहरणे कशी विसरता येतील? ...या प्रश्नांची उत्तरे नानांनी द्यावीतभाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे प्रकार नानाकडून झाले. एका कार्यकर्त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचे षड्यंत्र याच नानाने रचले. दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना विचारे कॉम्प्लेक्स येथे कॅडसन कंपनीला एक हजार स्के. फुटाचा गाळा कसा मिळाला? त्यांच्या शेतीवर असणारे स्मशानभूमीचे आरक्षण कसे काय व कोणी उठविले? याची उत्तरे त्यांनी द्यावीत, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.