शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाना जरग यांच्या सुनेचा पत्ता कट

By admin | Updated: October 5, 2015 00:55 IST

भाजपची उमेदवार यादी : निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना

कोल्हापूर : भाजप-ताराराणी आघाडीची अंतिम यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली. यामध्ये गेल्या २५ वर्षांपासून पक्षकार्यात असणारे भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक नाना जरग यांच्या सुनेलाच उमेदवारी डावलण्यात आली. पक्षाने येथून गीता गुरव यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नवीन आलेल्यांना उमेदवारी देऊन जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या रायगड कॉलनी-बाबा जरगनगर (प्रभाग क्र. ७८) येथून भाजप-ताराराणी आघाडीकडून भाजपचे माजी नगरसेवक व माजी महानगर जिल्हाध्यक्ष नाना जरग यांनी आपल्या भावाची सून वैशाली संजय जरग यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. रितसर मुलाखतही दिली होती. यावेळी पक्षाच्या नेत्यांकडून तिकीट तुम्हालाच, अशी हमी देण्यात आली होती. परंतु, रविवारी अचानक उमेदवारी यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले. नाना जरग हे गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षाशी एकनिष्ट राहून कार्यरत आहेत. त्यांनी महानगर जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, अशी पदे भूषविली असून, सध्या ते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय त्यांच्यासह त्यांच्या सुनेनेही जरगनगर प्रभागात नगरसेवक म्हणून दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. असे असताना उमेदवारी डावलल्याने धक्का बसला आहे. उमेदवारी डावलण्यामागील कारणही स्पष्ट करण्यात आलेले नाही. उलट भाजप व ताराराणी आघाडीकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. त्याचबरोबर शेजारी प्रभागात जरग यांनी सांगितलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे. परंतु, त्यांना मात्र उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे नेमके पक्षात काय सुरू आहे? असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे. तिकीट वाटपात आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचीही चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)मी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ भाजपचे काम करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली आहे. असे असतानाही उमेदवारी डावलण्यात आली. ती का डावलली? याचे कारणही स्पष्ट करण्यात आले नाही. आपले कुणाशीही वैरत्व नाही. आपण स्वत:साठी तिकीट मागितले नव्हते. रायगड कॉलनी-जरगनगर व रामानंदनगर-जरगनगर प्रभागातून पक्षाच्या दोन जागा निवडून आणण्याची ग्वाही आपण दिली होती. त्याचबरोबर पक्षाच्या नेत्यांनीही तुमचे तिकीट फायनल असल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. जुन्या कार्यकर्त्याला डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी का दिली? हे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.- नाना जरग, माजी नगरसेवक, भाजप