शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मलाबादे यांचे चौकातून नाव गायब

By admin | Updated: March 3, 2017 23:01 IST

नगरपालिका, संघटनेचे दुर्लक्ष : अक्षरे निखळून पडली; सुशोभीकरणाची मागणी

इचलकरंजी : शहरातील मुख्य मानला जाणारा जनता चौक आपला करण्यासाठी अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र, यंत्रमाग कामगारांना हक्क मिळवून देणारे चळवळीतील नेते कॉ. के. एल. मलाबादे यांचे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेने केला. त्यानंतर चौकाचे सुशोभीकरण करून त्यावर मलाबादे यांचे नाव लावण्यात आले; परंतु काही काळातच चौकाभोवती लावण्यात आलेल्या फलकाची दुरवस्था झाली आणि मलाबादेंचे नावही एकेक करीत निखळून पडले. याकडे नगरपालिकेकडे पाठलाग करून, ठराव करून घेणाऱ्या लालबावटा संघटनेने लक्ष दिले नाही.इचलकरंजी शहरामध्ये महापुरुषांची जयंती, गणेशोत्सव मिरवणूक, भारताने जिंकलेला क्रिकेट सामना, शहरासाठी महत्त्वाचा एखादा ठराव झाल्यास अशा सर्व प्रमुख निमित्ताने एकत्रित जमून आनंदोत्सव साजरा करणे. त्याचबरोबर आंदोलने, निदर्शने यासाठी शहरातील मुख्य मानला जाणारा ‘चौक’ म्हणून या जनता चौकाची प्रचिती आहे. या चौकाला आपले नाव द्यावे. आपल्या व्यक्तीचा, समाजाच्या प्रमुखाचा पुतळा उभा करावा, यासाठी अनेकजण नजरा लावून बसले होते. दरम्यान, इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील मुख्य घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांचे प्रतिनिधित्व करून चळवळीतून सातत्याने पाठपुरावा करीत न्याय व हक्क मिळवून देणारे म्हणून प्रसिद्ध असणारे माजी आमदार कॉ. के. एल. मलाबादे यांची आठवण शहराला राहावी. भावी पिढीला आदर्श मिळावा, यासाठी मलाबादे यांचे नाव या चौकाला द्यावे, अशी मागणी लालबावटा संघटनेच्यावतीने जोर धरू लागली.संघटनेच्यावतीने यासाठी आंदोलने केली. नगरपालिकेला निवेदन दिले. त्यावेळी नाव देण्यावरून बरेच वादंग उठले होते. त्यानंतर नगरपालिकेत सत्तांतर होताना मलाबादे यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा ‘हातभार’ लागला. त्यावेळी त्या कार्यकर्त्यानेही ही मागणी उचलून धरली. त्यास मंजुरी देत तत्कालीन नगराध्यक्षा व पदाधिकाऱ्यांनी ठराव करून चौकाचे नामकरण केले. हा ठराव झाल्यानंतर लालबावटा संघटनेच्यावतीने साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. चौकाच्या चोहोबाजूंनी फलक उभारून त्यावर कॉ. के. एल. मलाबादे चौक, असे लिहिण्यात आले. मात्र, कालांतराने याकडे दुर्लक्ष झाल्याने मलाबादे यांचे नाव एकेक करीत निखळून पडले. संघटनेने व नगरपालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून चौकाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)इचलकरंजीतील के. एल. मलाबादे चौकात मलाबादे यांचे नामकरण झाल्यानंतर चोहोबाजूने लावलेल्या फलकावरून मलाबादे यांच्या नावातील काही अक्षरे निघून गेल्याचे एक महिन्यापूर्वी चित्र होते.