शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘नमामि पंचगंगा’ प्रकल्प त्वरित राबविण्यात यावा

By admin | Updated: April 11, 2017 00:01 IST

संभाजीराजे : मंत्री उमा भारतींकडून प्रतिसाद

कोल्हापूर : ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर कोल्हापूरकरांची जीवनरेखा असणाऱ्या पंचगंगा नदीसाठी ‘नमामि पंचगंगा’ हा प्रकल्प केंद्राने तातडीने राबविण्याची मागणी सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली. त्यासाठी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय नदी व संवर्धन योजनेअंतर्गत तातडीने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे याकडे संभाजीराजे यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात सभागृहाचे लक्ष वेधले.त्यावर केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. कोल्हापूरला ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते, पण कोल्हापूरकरांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेली पंचगंगा आज जगातील प्रदूषित नद्यांमध्ये गणली जात आहे. त्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे होणारे पोटांचे आणि आतड्यांचे विकार यामुळे शहराच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे म्हणून पंचगंगेचे प्रदूषण रोखण्याची तातडीने गरज आहे.यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषेदेने राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पंचगंगा शुद्धिकरणासंदर्भात पाठविलेला प्रस्ताव केंद्रीय व वने पर्यावरण मंत्रालयाने फेटाळला. मात्र, पंचगंगेच्या प्रदूषणाची तीव्रता लक्षात घेऊन या प्रकल्पाला मान्यता द्यावी आणि या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले पाहिजे. तसे जर घडले तर ‘नमामि पंचगंगा’ हा प्रायोगिक प्रकल्प छोट्या नद्यांच्या संवर्धनासाठी आदर्शवत ठरू शकतो, अशी खात्री संभाजीराजे यांनी व्यक्त केली.