पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आगीत सुमारे ९० एकरांतील ऊस जळून खाक झाला. जवाहर कारखान्याच्या चार बैलगाड्याही जळाल्या. सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. धुळाप्पा धनगर यांच्यात ऊसतोड असताना आग लागली. बैलगाडीखाली झोपाळ्यातील बालकाला मजुराने वाचविले. धनगर, कुंतीनाथ व दादासो डूम, संगीता शिरगुप्पे, प्रकाश डूम, कांचनमाला डूम, कुबेर खड्ड, आनंदा शिरगुप्पे, महादेव व सूरज माळी, श्रीकांत कागले व आण्णा कागले यांचे नुकसान झाले.
पट्टणकोडोलीत नव्वद एकर उसाला आग
By admin | Updated: January 15, 2015 00:12 IST