शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नाईकनवरे-शारंगधर अंगावर धावले

By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST

महापालिका सभा : छुपा नको, सतेज पाटील यांना विरोध करायचाय तर थेट करा; जयंत पाटील यांचे खडे बोल

कोल्हापूर : सभागृहात मतदानासाठी पाठबळ मिळावे, यासाठी माजी आमदार मालोजीराजे यांची आठवण होते, तशी इतरवेळी का होत नाही? असा सवाल ‘व्हिप’मुळे महापौरांविरोधात मतदान करायची वेळ आल्याने चिडलेल्या नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी केला. यावर, ते आम्ही बघतो. तुम्ही काही बोलायचे कारण नाही, असे शारंगधर देशमुख यांनी सुनावले. या मुद्द्यावरून नाईकनवरे व शारंगधर देशमुख यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवक रद्दच्या ठरावासाठी झालेली शुक्रवारची सभा अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. नाईकनवरे व शारंगधर देशमुख यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्यानंतर नाईकनवरे जागेवरून उठून शारंगधर यांच्या आसनाकडे गेले. यावेळी एकमेकांकडे बोट दाखवून अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. दरम्यान राजाराम कारखान्याच्या जागेवरील बगिचासाठीचा ठराव हा रस्त्याचे काम रखडल्याच्या रागातून आणला आहे. मात्र, याचे राजकारण करीत काही कारभारी आमदार महादेवराव महाडिक यांचे कान भरत, महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्याचे नाट्य खेळत आहेत. माजी मंत्री सतेज पाटील यांचा महापौर करायचा नसेल, तर उघडपणे विरोध करुया. यासाठी छुप्या कारवाया करण्याची गरज नाही. कुचकट राजकारण करून शहरास वेठीस धरू नका, असे खडे बोल नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी महापौर समर्थक नगरसेवकांना सुनावले. हाच धागा पकडत राजू लाटकर यांनी कायद्याचा काना-मात्रा आम्हास कळतो. महाडिकांवर खोटी निष्ठा दाखवत कोल्हापूरच्या बदनामीस हातभार लावणाऱ्या सुनील कदम यांनी लुडबुड थांबवावी, नाही तर भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. यावेळी सभागृहाने कदम यांचा निषेध नोंदवत लाटकर यांना पाठिंबा दिला.‘राजाराम’चा ठराव २०१३ मध्ये आला. आता २०१५मध्ये यावरून राजकारण सुरू आहे. त्यावेळी सत्यजित कदम आपण का बोलला नाही? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. यावर, ‘सतेज पाटील यांचा दबाव होता. त्यामुळे प्रशासन झुकले. सर... आता सरकार आपलेच आहे. हॉटेलचे काय करायचे, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या जागेतून जाणाऱ्या डी. पी. रस्त्याचे काय झाले, आरक्षण कुठे व कसे टाकायचे, हा उद्योग आम्हालाही करता येतो’, असे उत्तर कदम यांनी दिले.न्यायालयातही माळवींविरोधात कौल गेल्यास ठरावाची वाटचाल अशी असेल१ सभागृहात संमत ठराव नगर सचिवांच्या सहीने महापौरांच्या सहीसाठी पाठविला जाणार२ महापौरांनी या ठरावावर पुढील सभेपूर्वी निर्णय घेणे बंधनकारक३ यानंतर ठराव आयुक्तांच्या संमतीने राज्य शासनाकडे जाईल.४ राज्य शासन महापौरांना एका महिन्यात म्हणणे सादर करण्याचे नोटीस देणार५ राज्य शासनाने किती कालावधित निर्णय द्यावा, असे बंधन नाही.६ राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात महापौरांना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा७ दरम्यानच्या काळात १५ नोव्हेंबर २०१५पर्यंत नवीन सभागृह अस्तित्वात येणार