कोल्हापूर : शहरातील बाजारपेठेत नागपुरी संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, संत्री घेण्यासाठी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पाच बंगला, कपिलतीर्थ मार्केट येथील बाजारांत आज, रविवारी ग्राहकांनी गर्दी केली होती. दुसरीकडे, गत आठवड्यातील असलेले भाज्यांचे दर ‘जैसे थे’ आहेत. मात्र, तूरडाळ, मूगडाळ व मुगाच्या दरात प्रतिकिलोमागे चार रुपयांपासून ते १२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.दिवाळी सण होऊन चार दिवस झाल्यानंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी कमी होती; पण हातगाडी विक्रेत्यांकडे नागपूर संत्र्यांसाठी मागणी होती. या संत्र्यांचा दर प्रतिकिलो ४० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत होता. मोसंबीची आवकही वाढली आहे. त्यांचा दर साडेसातशे रुपयांवरून (दहा किलो) सातशे रुपयांवर आला आहे. या दरात घसरण झाली आहे.तसेच बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर सुमारे ६० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत होते. टोमॅटो, ढबू, गवार यांच्या आवकेत वाढ झाली असून, ढबू २०० रुपयांवरून शंभर रुपये, तर गवार दोनशे रुपयांवरून दीडशे रुपयांवर असा दहा किलोंचा दर आहे. वरणा, दोडका यांच्या आवकेत वाढ झाली आहे. मात्र, कोथिंबिरीच्या पेंढीचा दर स्थिर म्हणजे १८०० रुपये आहे. साखर ३४ रुपयांवरून ३२, रवा व मैदा २८ रुपये प्रतिकिलो, शाबू ९२ रुपयांवरून ८४ रुपये झाला आहे. शेंगदाणे ८८ रुपये झाले आहेत. एकंदरीत, दिवाळीनंतर बाजारात ग्राहकांची गर्दी कमी दिसून येते. (प्रतिनिधी)परतवाडा, अमरावती या भागांमधून बाजारात नागपूर संत्र्यांची आवक झाली आहे. त्यामुळे त्यांचा दर ग्राहकाला परवडणारा आहे.- शहाजहान करीम बागवान,फळविक्रेते, लक्ष्मीपुरीटोमॅटो, कांद्याच्यादरात घसरण...गत आठवड्यात कांद्याचा दहा किलोंचा दर १४० रुपये होता, तो या आठवड्यात १२० रुपये झाला. तसेच टोमॅटोचा दर कमी होऊन तो प्रतिकिलो दहा रुपये होता.
नागपुरी संत्री बाजारात
By admin | Updated: November 9, 2014 23:36 IST