शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरोत्थान’ला पुन्हा लागले ग्रहण

By admin | Updated: January 7, 2015 00:56 IST

निर्मळेंच्या निवृत्तीमुळे जागा रिक्त : अधिकारी नेमण्याची मागणी

कोल्हापूर : महापालिकेचे कार्यकारी अभियंता एम. एम. निर्मळे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाले. गेली साडेतीन वर्षे रखडलेल्या १०८ कोटी रुपयांच्या नगरोत्थान योजनेची जबाबदारी निर्मळे यांच्याकडे होती. प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे कार्यकारी अभियंतापदाची खुर्ची रिकामी राहिल्यास नगरोत्थान योजनेला पुन्हा ग्रहण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगरोत्थानबाबत तक्रारी वाढत असल्याने सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.महापालिकेला केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींचा निधी मिळाला. मे २०११ मध्ये मुंबईतील ‘शांतीनाथ रोडवेज’, ‘रेलकॉन’ व ‘यूव्हीबी’ अशा तीन कंपन्यांना ही कामे मिळाली. आॅक्टोबर २०११ पासून पुढे दीड वर्षाची कामे पूर्ण करण्याची मुदत त्यांना दिली. यातील सरासरी ३० टक्के कामे पूर्ण करून ठेकेदारांनी तब्बल २७ कोटी रुपयांची रक्कमही उचलून अर्ध्यातच कामे सोडून पळ काढला. निधी असूनही ‘काम घेता का काम?’ असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली. अकरा रस्त्यांच्या फेरनिविदा काढून नव्याने प्रक्रिया राबविली. चौथ्यांदा काढलेल्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिल्याने पंधरा दिवसांपूर्वी नगरोत्थान योजनेतून रस्ते, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट, आदी कोट्यवधींची कामे सुरू झाली. निर्मळे यांच्या निवृत्तीमुळे आता नव्या सक्षम अधिकाऱ्याकडे पदभार देऊन योजना मार्गी लावण्याची गरज आहे. कामात त्रुटी आहेत. तक्रारी येत आहेत. कार्यकारी अभियंता नसल्याने कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होणार आहे.