शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

By admin | Updated: July 4, 2017 01:16 IST

‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नंदवाळ पायी पालखी दिंडी सोहळ्याची नगरप्रदक्षिणा करवीरनगरीत सोमवारी ‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात पार पडली. या दिंडीत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या. वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा-ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा अखंड गजर केला. ज्ञानेश्वर पालखी सोहळा भक्त मंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. पाच बैलगाड्या, पालखी रथ, अशा सजलेल्या लवाजम्यासह मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरापासून या नगरप्रदक्षिणा दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली. त्यात डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला व खांद्यावर वीणा घेतलेले वारकरी सहभागी झाले होते. पालखी दिंडी बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड- जोतिबा रोड-भवानी मंडप येथे आल्यानंतर रिंगण सोहळा झाला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यानंतर दिंडी मिरजकर तिकटी, शाहू बँक, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केटमार्गे सासने इस्टेट येथे पोहोचली. याठिकाणी रात्री ७ ते ८ या कालावधीत ह.भ.प. एम. पी. पाटील (कावणेकर) ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ह.भ.प आनंदराव लाड महाराज यांचे प्रवचन, कीर्तन झाले. या दिंडीचे संयोजन जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळ, ज्ञानेश्वर माऊली पालखी (दिंडी) सोहळा भक्त मंडळ यांनी केले होते. पालखी दिंडीचे पूजन महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र किंकर, मंजुषादेवी पाटील, दीपक गौड, भक्त मंडळाचे बाळासाहेब पवार यांच्यासह दत्त भजनी मंडळ (गौळवाडा, शाहूवाडी), विठ्ठलपंथी भजनी मंडळ (कासारवाडी, राधानगरी), माऊली महिला भजनी मंडळ (देवाळे), बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट (हुपरी) चे भक्त मंडळ, वारकरी सहभागी झाले होते. आज पुईखडी येथे रिंगणआषाढी एकादशीनिमित्त आज, मंगळवारी सकाळी सात वाजता मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरातून नंदवाळकडे पायी पालखी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. दिंडी बिनखांबी गणेश मंदिर-निवृत्ती चौक, उभा मारुती-खंडोबा तालीम-जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे संकल्पसिद्धी मंगल कार्यालय पुईखडी येथे पोहोचणार आहे. येथील मोकळ्या जागेत रिंगण सोहळा होणार आहे. काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा पालखी दिंडी पिराचीवाडी, वाशी मार्गे श्री क्षेत्र नंदवाळ येथे मार्गस्थ होणार आहे.