शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सात ग्रामपंचायती होणार नगरपंचायती

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

लोकसंख्येचा निकष : शासनाने मागविल्या हरकती; शुक्रवारी अंतिम मुदत

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती होणार आहेत. गारगोटी, चंदगड, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी-तनवाड, आजरा, राधानगरी यांचा यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील सर्व तालुकास्तरीय ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याची उद्घोषणा केली आहे. त्यासाठी शुक्रवार (दि.६)पर्यंत हरकती मागविल्या आहेत. तालुकास्तरावर बहुतांश सर्व शासकीय कार्यालये आहेत. बाजारपेठाही आहेत; परंतु ग्रामपंचायत असल्याने तालक्याच्या ठिकाणच्या या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातील सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत हरकती शुक्रवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावयाच्या आहेत. आलेल्या हरकतींवर शासनाकडून विचार होऊन त्यानंतर नगरपंचायतींची घोषणा केली जाईल.जिल्ह्यातील सात तालुकास्तरीय ग्रामपंचायतींची माहिती यापूर्वीच नगरपालिका शाखेने शासनाला पाठविली आहे. त्यावरील हरकतीही वेळोवेळी सादर केल्या आहेत; परंतु शासनाच्या घोषणेनुसार कोल्हापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसंदर्भात पुन्हा हरकती घेण्यात येणार आहेत.२५ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये, तर १० हजारांच्या पुढे लोकसंख्येच्या गावांचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना २१ मे २०१२ ला नगरविकास विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका विभागाला केल्या होत्या. सहायक संचालकांच्या अभिप्रायाबरोबरच २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ किती?, अकृषक रोजगाराची टक्केवारी किती?, प्रस्तावित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीशेजारी असणाऱ्या नगरपरिषदेचे नाव, यापूर्वी नगरपरिषद अथवा नगरपंचायत करण्यासाठी प्रस्ताव पाठविला असेल, तर त्या प्रस्तावाची प्रत अशी विस्तृत माहिती मागविली होती. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या नगर परिषद विभागाने १० हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सात गावांची यादी तयार केली आहे. या गावांची शासनाला अपेक्षित असणारी सर्व माहिती संकलित करून ती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. सध्या फक्त तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींची नगरपंचायती करण्यासंदर्भात उद्घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रस्तावांचा सध्या तरी विचार झालेला नाही. (प्रतिनिधी)शासननिर्देशानुसार या हरकती ६ तारखेपर्यंत स्वीकारून दोन दिवसांत त्या शासनाकडे पाठविल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही शासनस्तरावरूनच होईल.- ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग.