शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘एन ए’ परवाने पालिकेकडे मार्गस्थ

By admin | Updated: December 14, 2014 23:44 IST

जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : रात्री उशिरापर्यंत प्रमाणपत्रांचे काम

सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रखडलेली बिगरशेती प्रस्तावाची कामे शनिवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आली असून, हे प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बिगरशेती आढावा बैठकीत वादंग झाले होते. अनावश्यक ‘ना हरकत’ दाखले व कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक व बिगरशेतीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्यांनी केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत ५५ पैकी २७ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जे ‘ना हरकत परवाने’ रखडले होते, त्यांची तात्काळ निर्गती करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील दहा ते बारा कर्मचारी शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यालयात थांबून होते. यामधील ३२ बिगरशेती प्रस्तावांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कुशवाह यांच्यापुढे सादर करण्यात आले. सुट्टी असतानाही कुशवाह यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून सर्व प्रस्तावांवर सह्या करून यांना अंतिम मंजुरी दिली. मंजूर करण्यात आलेले बिगरशेतीचे प्रस्ताव आता उद्या (सोमवार) महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर बिगरशेतीच्या जमिनीमध्ये बांधकामाला परवाना मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बिगरशेतीचे प्रस्ताव रखडले होते. यासाठी सोळाहून अधिक विभागांचे ‘ना हरकत’ परवाने लागत असल्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत गोंधळ झाला होता. यावेळी प्रत्येक प्रस्तावांची छाननी करण्यात आली. यामधील ५५ प्रस्तावांपैकी २७ प्रकरणांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या होत्या, तर पाचमध्ये काही परवाने आवश्यक असल्याचे आढळून आले होते. यासाठी लागणारे परवाने नागरिकांनी आणून दिले. त्यानंतर ३२ प्रस्तावांचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण करण्यात आले. आता हे प्रस्ताव उद्या (सोमवार) महापालिकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)दिलेले वचन पाळले : कुशवाह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असणाऱ्या सर्व बिगरशेती परवान्यांची पूर्तता करून सोमवारपर्यंत ते महापालिकेकडे सादर करण्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी याची पूर्तता करून सोमवारी हे प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. यासाठी कर्मचाऱ्यांनी सुट्टीदिवशीही काम केले. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंतही काम केले. उर्वरित बिगरशेतीचे प्रस्ताव पुन्हा नागरिकांकडे परत देण्यात आले आहेत. त्यासाठी लागणारे ना हरकत परवाने आता जोडावे लागणार आहेत.