शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

माझा सूर्य अजून अस्ताला गेलेला नाही

By admin | Updated: May 26, 2016 00:40 IST

महादेवराव महाडिक यांचे प्रत्युत्तर : तुमचे यश क्षणभंगुर; सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर : आजरा साखर कारखाना निवडणुकीत आपण कोणावरही अवमानकारक बोललो नाही, पण शाहूपुरीत माझ्या गाडीचे दार उघडण्यासाठी पुढे-मागे करणाऱ्यांनी ‘अस्तास गेलेला सूर्य’ अशी माझ्यावर टीका केली. सूर्याची उपमा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, परंतु कारखान्याच्या निकालाने माझा सूर्य अजून अस्ताला गेला नसल्याचेच स्पष्ट झाल्याचे प्रत्युत्तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिले. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा महागात पडेल, असा इशारा देत विधान परिषदेतील यशाने हुरळून जाऊ नका, ते क्षणभंगुर असल्याचा टोला त्यांनी आमदार सतेज पाटील यांना लगावला.महाडिक म्हणाले, ‘आजरा तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या सहकार्याने स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टाने कारखान्याची उभारणी केली. महाआघाडीच्या नेत्यांनी आपणाला बोलावले, त्यांचे आभार मानतो. तिथे कोणावर टीका-टिप्पणी अथवा अवमान व्हावा, असे काहीही बोललो नाही; पण काही मंडळींनी आपल्यावर टीका केली. महाडिक हे वादळ आहे, या वादळाला थोपविण्याची ताकद ऐऱ्यागैऱ्यांमध्ये नाही. वादळात घाण उडून जाऊन चांगले तेवढे शिल्लक राहते. हेच या निकालावरून आजरा कारखान्याच्या सभासदांनी दाखवून दिले. सूर्याचा कधीच अस्त होत नाही. ज्यांचा पापांचा घडा भरला आहे, त्यांच्याच तोंडून सूर्यास्ताची भाषा येते; पण सूर्यास्त कोणाचा होणार हे काळ सांगेल.’ महाडिक ज्या शिडीने वर जातो त्याला कधीच लाथ मारत नाही, कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबांना भरपूर दिले, त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. आजरा कारखान्याच्या निवडणुकीत आपण केवळ अर्धा तास गेलो तर परिवर्तन झाले, पूर्ण ताकद लावली असती तर वेगळे चित्र दिसले असते, असे सांगत ‘परिवर्तना’मध्ये अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर, रवींद्र आपटे या त्रिमूर्तीसह संजय घाटगे, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित मुक्ती, मनसे, शिवसेना यांची एकसंध मोट महत्त्वपूर्ण ठरल्याचेही महाडिक यांनी सांगितले. ‘ही तर विरोधकांना सणसणीत चपराक ’कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यात पूर्ण बहुमत मिळवून कोल्हापूरच्या ग्रामीण भागात भाजपने पाय घट्ट रोवल्याचे सिद्ध झाले आहे. ‘आम्हाला सहकारातले काय कळते,’ अशी वल्गना करणाऱ्यांना हा विजय म्हणजे चपराक असल्याची प्रतिक्रिया सहकार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. या विजयासाठी दादांनी खूप प्रयत्न केले होते. गडहिंग्लज कारखान्यातही त्यांनी ताकद पणाला लावून प्रयत्न केले; परंतु सत्तांतर करता आले नव्हते. ती कसर आजरा कारखान्याच्या सभासदांनी भरून काढून भाजपला सहकार क्षेत्रात निवडणुकीने प्रवेश मिळवून दिला. त्याबद्दल आनंद व्यक्त करून पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘प्रस्थापितांसाठी हा विजय नक्कीच धडकी भरविणारा आहे. या कारखान्याच्या विस्तारीकरणासह एकंदरीत विकासासाठी सरकार त्यांना भक्कमपणे मदत करेल. आजरा कारखान्यात सभासदांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत आहे. सहकारातील सभासद आणि जानकार यांचे असेच सहकार्य मिळत गेले, तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला लागलेले स्वार्थी व भ्रष्ट प्रवृत्तीचे ग्रहण दूर करून सहकार क्षेत्र शुद्धीकरणाचा नक्की प्रयत्न करू, असेही पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे.एका बाजूला स्वत: खासगी कारखाने चालवायचे आणि दुसऱ्या बाजूला सहकारी साखर कारखानदारीचे नेतृत्व करायचे, अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या एकाधिकारशाहीला आजरा साखर कारखान्यातील त्यांच्या पॅनेलच्या पराभवाने चपराक बसली आहे. आजरा कारखान्यात सर्वपक्षीयांची मोट बांधण्यात आपण यशस्वी झाल्याने हा विजय झाला. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका निर्णायक ठरली. आमच्या संघटनेचे उमेदवार नवखे असले तरी त्यांनी चांगली लढत दिली. या विजयाची पुनरावृत्ती बिद्री व भोगावती साखर कारखान्यांत झाल्याशिवाय राहणार नाही.- खासदार राजू शेट्टीआजरा कारखान्याची निवडणूक चुरशीची झाली. ‘क्रॉस व्होटिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने निसटती सत्ता गमवावी लागली. सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. कारखान्याच्या हितासाठी सत्तारूढ गटाला सहकार्य करू. - आमदार हसन मुश्रीफ, नेते, रवळनाथ शेतकरी विकास आघाडी स्वत:च्या पायावर उभारून स्वत:चा विकास व स्वत:च्या लोकांचा विकास करून देणारा हा निवडणुकीतील कौल आहे. सरकार निश्चितपणे सर्पनाला व आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करून या आजरा कारखान्याला उसामध्ये स्वयंपूर्ण बनवेल. कारखान्यातील परावलोकत्व या चराटींच्या नेतृत्वाखाली कायमचे संपेल, याची खात्री आहे. त्यामुळे इतर कारखान्यांप्रमाणे आजरा कारखानाही निश्चितच अग्रेसर ठरेल. या विजयामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, विष्णू केसरकर यांच्या मोलाचे लाभलेल्या योगदानामुळे कारखान्याची प्रगतीच होईल. - संजय घाटगे, माजी आमदार