शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माझा लढा शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही

By admin | Updated: August 28, 2016 00:42 IST

चंद्रदीप नरके : काहीजण जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याची टीका

कोल्हापूर : माझा लढा हद्दवाढविरोधी आहे. शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी पेठ व १८ गावांतील ग्रामीण जनता आणि पर्यायाने माझ्यामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणारे लोक कोण आहेत, याचा शिवाजी पेठेतील जनतेने गांभीर्याने विचार करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे मेळावा झाला होता. मेळाव्यात, शिवाजी पेठेत राहून पेठेतील जनतेबाबत चुकीची वक्तव्ये केल्याबद्दल आमदार चंद्रदीप नरके यांचा निषेध नोंदवीत त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. तिला आमदार नरके यांनी संयमाने उत्तर दिले. आमदार नरके म्हणाले, शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आम्ही सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. पण सध्या हद्दवाढीबाबत महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि हद्दवाढसमर्थक यांची माझ्याविरुद्ध निरर्थक आणि संदर्भहीन वैयक्तिक टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. माझ्यासह आमच्या नरके घराण्याच्या चार पिढ्या शिवाजी पेठेत वास्तव्यास आहेत. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात, २० आॅगस्ट रोजी, शहराच्या लोकप्रतिनिधींनी ‘शिवाजी पेठ आली तर १८ गावांतील लोक वाहून जातील’ असे न शोभणारे वक्तव्य केले आहे. आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी व हद्दवाढसमर्थक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हीच १८ गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास होणार, असे वारंवार सांगितले आहे; पण या सभेला उपस्थित असणाऱ्या पेठेतील कोणाही नागरिक अथवा पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले नाही. शिवाजी पेठ आणि १८ गावांतील ग्रामीण जनतेचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. त्यांच्यात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हे लोकप्रतिनिधी करीत असल्याची टीका नरके यांनी केली. ६० नाले गायब, नवे रुग्णालय, नाट्यगृह नाही शहराच्या विकासाचा कारभार पाहता एकही नवे रुग्णालय अथवा नाट्यगृह बांधू शकला नाहीत, अशी टीका करीत नरके म्हणाले, नाल्यात भर टाकून ७६ नाल्यांपैकी १६ नाले आपण शिल्लक ठेवले. ड्रेनेजची दुरवस्था, केरकचरा उठावाचा बोजवारा, उपनगरांची दुरवस्था याबाबत टीका करीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कारभाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचीही टीका त्यांनी केली. प्रत्यक्षात महापालिकेतील नियोजनशून्य कारभारामुळेच शहराचे नाव व महानगरपालिका बदनाम झाली असल्याबाबत आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले. महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी हद्दवाढीत समाविष्ट केलेल्या गावांना चार वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने कर वाढविला जाणार असे महापालिकेचे पदाधिकारी सांगतात; पण त्याची श्वेतपत्रिका काढा. कारण शेतीवर आरक्षण टाकणार नाही म्हणून ते जाहीररीत्या बोलत असले तरी भविष्यातील विकास आराखड्यात जागांवर आरक्षण टाकण्याचा डाव या पदाधिकाऱ्यांचा दिसतो, असाही आरोप त्यांनी केला.