शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

माझी प्रकृती एकदम ठणठणीत : मंडलिक

By admin | Updated: October 26, 2014 00:05 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी प्रकृती अत्यवस्थ आहे’

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी प्रकृती अत्यवस्थ आहे’ इथपासून ते ‘मी संपलो’ या पद्धतीच्या निराधार, खोडसाळ बातम्या व अफवा पसरवून विरोधकांनी स्वाभिमानी जनतेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. आजही या अफवा जोर धरत आहेत; परंतु माझी प्रकृती ठणठणीत असून, मी सध्या वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे. ज्यांनी माझ्याबाबत अफवा पसरविल्या, त्यांना परमेश्वर माफ करो, अशा शब्दांत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आपल्या भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.ते म्हणाले, गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या माझ्या सार्वजनिक आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब जनता आणि स्वाभिमानी कार्यकर्ते ही माझी अभेद्य कवचकुंडले आहेत. त्यांच्या बळावरच आजवर अनेक लढाया लढलो आहे, अनेक संघर्षमय प्रसंगांत यशस्वी झालो आहे. निवडणुकीतील यश-अपयश खंबीरपणे पचवून मी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि अस्मितेसाठी लढत राहिलो. त्यामुळे आजपर्यंत माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार व मंत्री होऊ शकला, याची मला जाणीव आहे. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना अशा प्रकारच्या खोडसाळपणाला व अफवांना मी व माझ्या कार्यकर्त्यांनी कधीही भीक घातलेली नाही. तरीही दिवाळीच्या सणाच्या काळात अशा पद्धतीची दुर्बुद्धी सुचलेल्या विघ्नसंतुष्ट लोकांना परमेश्वराने माफ करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.