शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनी स्वबळावर विकास साधावा

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

एन. एन. मालदार : ‘हाँ, मुमकीन हैं’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : मुस्लिम समाजाला आरक्षणाची आपण मागणी करीत आहोत. मात्र, मुस्लिम समाजाने स्वबळावर विकासाचा प्रयत्न केला पाहिजे. समाजाने उच्चशिक्षणाची जोड देऊन हा विकास सहज साधता येईल, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी रविवारी केले. शाहू स्मारक भवन येथे सेंटर फॉर रेनेसॉतर्फे लेखक हुमायून मुरसल लिखित ‘हाँ, मुमकीन हैं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. पुण्याचे आर.जी.सी. फोरमचे संचालक डॉ. के. जी. पठाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रोसेस रिइंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रेसिडेंट डॉ. बी. ए. मुजावर, उद्योगपती सलाउद्दीन ठाकूर उपस्थित होते. यावेळी ‘हाँ, मुमकीन हैं’ या पुस्तकाचे व महात्मा गांधी मुस्लिम युनिव्हर्सिटी माहितीपत्रिकेचे प्रकाशन झाले. मालदार म्हणाले, उच्चशिक्षण आणि संशोधन या दोन गोष्टी आत्मसात केल्यास माणसांचा नक्कीच विकास होतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त जुजबी शिक्षण न घेता उच्चशिक्षण घेतले पाहिजे. आपल्या शिक्षणातून नवीन संशोधन करावे. हे संशोधन समाजाभिमुख असले पाहिजे. भविष्यात तुम्ही उच्चशिक्षण घेतलं तरच निभाव लागेल. मुस्लिम समाजातील २५ टक्के मुले शालेय शिक्षण घेत नाहीत, तर ९५ टक्के मुले उच्चशिक्षण घेत नाहीत. ही परिस्थिती बदलली तरच समाजाचा विकास होईल. डॉ. मुजावर म्हणाले, आजच्या शिक्षणामुळे मनुष्य फक्त साक्षर होतो. सुशिक्षित नाही. अनेकांकडे पदवी आहे; मात्र नोकरी नाही, ही परिस्थिती आहे. शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे की, गरिबांचे तर सोडून द्या; पण मध्यमवर्गीय लोकांच्या हातातूनसुद्धा आता शिक्षण लांब जाऊ लागले आहे. लेखक मुरसल म्हणाले, सहकार तत्त्वावर लोकसहभागातून २१ व्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मिशन महात्मा गांधी मुस्लिम युनिव्हर्सिटी २०२० आणि सेंटर फॉर रेनेसॉ २०१७ सुरू होत आहेत. या दोन शैक्षणिक आणि संशोधन संस्था मुस्लिमांच्या विकासाचे नवे मॉडेल होतील. प्रत्येक मुस्लिमाला विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करण्याच्या व आधुनिक शिक्षणाद्वारे प्रगत औद्योगिक मुस्लिम समाज घडविण्याचा, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सामाजिक प्रयोग आहे. याप्रसंगी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, डॉ. गेल आॅग्वेट, सेंटर फॉर रेनेसॉ अध्यक्ष हाशीमभाई मनगोळी, उपाध्यक्ष एम. बी. शेख, शौकत मुतवल्ली, मोहम्मदहनिफ काझी, मुबारक शेख, अब्दुलरशीद बागवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते. समीर बागवान यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)