शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मुस्लिम-मराठ्यांत भांडण लावण्याचा सरकारचा डाव

By admin | Updated: March 14, 2015 00:18 IST

मुरसल यांचा आरोप : आरक्षणप्रश्नी गडहिंग्लजला मुस्लिम बांधवांचा मोर्चा

गडहिंग्लज : मुस्लिमांना दिलेले आरक्षण काढून घेऊन मराठा व मुस्लिम समाजात भांडण लावण्याचा किंबहुना मुस्लिम बांधवांपासून मराठा समाजाला तोडण्याची चाल सरकार करत आहे, असा आरोप ‘हिंदी है हम..हिंदोस्ता हमारा’ परिषदेचे संस्थापक कॉ. हुमायून मुरसल यांनी शुक्रवारी केला.‘हिंदी है हम..हिंदोस्ता हमारा’ परिषदेच्या गडहिंग्लज शाखेतर्फे येथील प्रांतकचेरीवर मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत ५टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.मुरसल म्हणाले, आजअखेर मुस्लिम समाजाने काँगे्रसलाच मते दिली. मात्र, केंद्रात व राज्यात काँगे्रस आघाडीचे सरकार असतानादेखील मुस्लिमांना आरक्षण मिळाले नाही. हक्काच्या आरक्षणाचा हा अध्यादेश नव्याने काढावा यासाठी राज्यभर प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जातील. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, धनगर समाजाचे सिद्धार्थ बन्ने, बेरड समाजाचे शिवाजी नाईक, कॉ. गोविंद पानसरे विचार मंचचे अध्यक्ष प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आशपाक मकानदार यांचीही भाषणे झाली.मोर्चात मौलाना अजिम पटेल, अरविंद कित्तूरकर, हारुण सय्यद, रमजान अत्तार, राहुल पाटील, बाळासाहेब मुल्ला, राजू जमादार, इकबाल शायन्नावर, राजू खलिफा, युनूस नाईकवाडे, मुस्ताक मुल्ला, महंमदअली पठाण, जावेद बुडेखान, एम. एस. बोजगर, इर्षाद मकानदार, घुडूसाहेब मुगळे आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)शिष्टमंडळात सर्वधर्मीयसहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यासाठी भेटलेल्या शिष्टमंडळात मुस्लिम बांधवांसह मराठा, लिंगायत व बेरड समाजातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉ. पानसरेंना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.कुठे आहेत आमदार-खासदार ?मुस्लिम समाजाच्या मतांवर ज्यांनी सत्ता भोगली ते माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, पी. एन. पाटील ही मंडळी समाजाच्या हक्काच्या लढाईत कुठे आहेत ? त्यांनी कार्यकर्त्यांसह आरक्षणाच्या लढाईत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन कॉ. मुरसल यांनी यावेळी केले.आम्ही गोळ्या झेलायला स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रच लढतील. पानसरेंचा खून करून भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, धर्मनिरपेक्षतेसाठी गोळ्या झेलायला आम्हीदेखील तयार आहेत, असेही कॉ. मुरसल यांनी यावेळी स्पष्ट केले.कबनूर येथे निदर्शनेइचलकरंजी : मुस्लिम आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कबनूर (ता. हातकणंगले) येथील मुस्लिम समाजाच्यावतीने मुख्य चौकात रास्ता रोको व शंखध्वनी आंदोलन केले. तसेच शासननिर्णयाच्या परिपत्रकाची होळी करून शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात दिलावर पटेल, अल्ताफ मुजावर, जावेद फकीर, गणी मुल्ला, समीर जमादार, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)