शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम बांधवांनी झिडकारली ३० लाखांची ‘आॅफर’

By admin | Updated: November 11, 2016 00:35 IST

गडहिंग्लजमध्ये लोकशाही बळकट : घरटी वर्गणी काढून सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा निर्णय-- गुड न्यूज

राम मगदूम -- गडहिंग्लज --मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी ३० लाखांच्या देणगीची आॅफर देतानाच त्या मोबदल्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत समाजाने आपल्याला एकजुटीने मतदान करावे, अशी अपेक्षा येथील नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवाराने आपल्या चाहत्याकरवी केली होती. मात्र, ‘तो’ प्रस्ताव एकजुटीने झिडकारण्याबरोबरच लोकशाहीतील ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ आणि ‘मताधिकार’ अबाधित ठेवण्यासाठी घरटी वर्गणी काढून आपले सांस्कृतिक सभागृह आपल्याच पैशातून बांधण्याचा स्तुत्य निर्णय येथील मुस्लिम समाजबांधवांनी एकमुखानेघेतला. ऐन निवडणुकीच्या हंगामात सामाजिक आदर्शाचा नवा वस्तुपाठ निर्माण केल्याबद्दल गडहिंग्लजच्या मुस्लिम समाजाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.कोणतीही निवडणूक आली की धनाढ्य उमेदवाराकडून मतांची सौदेबाजी सुरू होते. एकेका मतापासून ‘गठ्ठा’ मतदानासाठी प्रलोभने दाखविली जातात. व्यक्तिगत आणि सार्वजनिक कामासाठीदेखील आमिष दाखविले जाते. लोकशाहीतील संकेत पायदळी तुडवून मतांचीही राजरोस सौदेबाजी होते. मात्र, त्याला येथील मुस्लिम बांधवांनी छेद दिला आहे.पुरोगामी आणि शांतताप्रिय शहर म्हणून गडहिंंग्लजची सर्वदूर ओळख आहे. सुमारे २१ हजार मतदारांपैकी मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास चार हजार आहे. त्यामुळेच ‘त्या’ ‘चाणाक्ष’ उमेदवाराने मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी ३० लाखांच्या देणगीची आॅफर दिली होती. त्यासंदर्भात विचारविनियम करून निर्णय घेण्यासाठी चार दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाची बैठक झाली. बैठकीत मुस्लिम समाजातीलच एका कार्यकर्त्याने तो विषय चर्चेसाठी मांडला. समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी ३० लाखांचा प्रस्ताव आला आहे. त्याला किंवा त्यापेक्षा जादा देणाऱ्यास समाजाने एक मत द्यावे आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार मतदान करावे, अशी सूचना केली. मात्र, तसे केल्यास मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज आणि राजकीय कटुता निर्माण होऊन गावातील सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचेल म्हणून त्यास जोरदार विरोध झाला.गडहिंग्लजमध्ये एकूण लोकसंख्येपैकी चारआणे लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे. अनेक वर्षांपासून येथील हिंदू-मुस्लिम गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. यामुळेच या ठिकाणी कधीही जातीय तेढ निर्माण झाले नाही. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करणारा मुस्लिम शिवजयंतीच्या मिरवणुकीतही सहभागी होतो. परवाच्या मराठा मोर्चातही त्यांनी भाग घेतला होता. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळेच समाजाने हा सौदा फेटाळला.३० लाखांसाठी समाज कुणाच्याही दावणीला बांधू नका. प्रत्येकाला इच्छेप्रमाणे मतदान करू द्या. दानशूरांकडून देणगी आणि घरपती दहा हजारांची वर्गणी काढून आपले सभागृह आपणच बांधूया, असे मत अनेकांनी मांडले. त्याचे उपस्थित सर्वांनी स्वागत केले. काहींनी ५० हजार ते लाखापर्यंतची देणगी स्वेच्छेने जाहीर केली तर उर्वरित समाजबांधवांनी १० हजारांची वर्गणी हप्त्याने देण्याची तयारी दाखविली. चर्चेअंती सांस्कृतिक सभागृह लोकवर्गणीतूनच बांधण्याचा निर्णय झाला.