कोल्हापूर : जगातील प्रत्येक गिर्यारोहकाप्रमाणेे कोल्हापूरची कस्तुरी सावेकर हिनेही माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तिचे हे स्वप्न आता अवघ्या २८ दिवसांवर येऊन ठेपले असून आज, रविवार (दि.१८) पासून बेसकॅम्पला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी तिने गेल्या पंधरा दिवसांत कुशीतील डिंगबोच, आयलँड पिक, चुखुंग, लोबुचे अशी उतुंग शिखरे सर केली आहेत.
जगातील सर्वांत उंच समजले जाणारे व २९ हजार २९ फूट इतकी उंची असलेल्या माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विडा कोल्हापूरच्या कस्तुरीने उचलला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती या मोहिमेसाठी पात्र ठरली आहे. मात्र, मागील वर्षीही कोरोना व आर्थिक अडचणींमुळे तिची मोहीम पुढे ढकलली गेली. यंदा तिने या सर्वांवर मात करीत १५ मार्च २०२१ ला काठमांडू गाठले आणि तिची ७० दिवसांची एव्हरेस्ट मोहिमेस सुरुवात झाली. ती जरी १५ मेच्या सुमारास एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी जाणार असली तरी तिची पूर्णत: तयारी व्हावी. त्या पोषक वातावरणात ती रुळावी. याकरिता तिने ३१ मार्च २०२१ पासून एव्हरेस्टच्या भोवतालची डिंगबोच - १४४६८ फूट, आयलँड पिक समीट (२०,३०५ फूट), चुखुंग (१५,५१८ फूट) आणि लोबुचे (१६,२१० फूट) अशी उत्तुंग शिखरे सर केली आहेत.
चौकट
आज, रविवारी सकाळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम यशस्वी व्हावी. मोहिमेवर जाणाऱ्या जगभरातील गिर्यारोहकांकरिता बेसकॅम्पवर पिक प्रमोशनमार्फत विशेष पूजा केली जाणार आहे. त्यानंतर कस्तुरी पहिले रोटेशन हे बेस कॅम्प ते कॅम्प एक अशी मोहीम करणार आहे. कॅम्प एक हा १९ हजार ९०० फुटांवर आहे. या रोटेशमध्ये खुंबू आईस फाॅल हा अत्यंत धोकादायक असणारा भाग आहे. या कॅम्पवर जाऊन पुन्हा मुक्कामाला ती येणार आहे.
फोटो : १७०४२०२१-कोल-कस्तुरी सावेकर
===Photopath===
170421\17kol_1_17042021_5.jpg
===Caption===
फोटो : १७०४२०२१-कोल-कस्तुरी सावेकर