शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुश्रीफांचा ‘पास’ अन् बंटीचा अचूक ‘गोल’

By admin | Updated: December 31, 2015 00:46 IST

आठवणी ताज्या : ‘गडहिंग्लज’च्या मैदानावरील ‘पास’ची निकालानंतरही चर्चा

राम मगदूम -- गडहिंग्लज -विधान परिषद निवडणुकीत ‘काँगे्रस’ची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारल्यानंतर आघाडी धर्म पाळणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘पास’ दिला. त्यानंतर विनय कोरे-सावकरांकडूनही ‘बाय’ मिळवून माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी ऐतिहासिक गोल नोंदविला. तो देखील ६५ मतांच्या फरकाने.त्याची हकिकत अशी, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा. विधान परिषदेचे घोडेमैदान जवळ आलेले. काँगे्रसच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच चाललेली. त्याच दरम्यान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर भरविलेल्या ‘राष्ट्रीय फुटबॉल’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मुश्रीफ व पाटील हे दोघेही व्यासपीठावर एकत्र होते. २१ नोव्हेंबर २०१५ला ‘गडहिंग्लज’च्या मैदानावरील मुश्रीफ आणि बंटींच्या ‘शेरेबाजी’ची जिल्हाभर जोरदार चर्चादेखील झाली. त्यावेळी भाषणात सतेज पाटील म्हणाले होते, विधान परिषदेसाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे; परंतु या सामन्यात ‘पास’ महत्त्वाचा ठरणार आहे. मुश्रीफांनी मला ‘पास’ द्यावा, मी नक्कीच ‘गोल’ नोंदवितो.मुश्रीफ म्हणाले होते. ‘पास’ देण्याची आमची तयारी आहे; परंतु त्याआधी सतेजनी ‘काँगे्रस’च्या तिकिटासाठी जोरदार सरावा करावा. तिकीट मिळविले, तरच त्यांना आमचा ‘पास’ मिळू शकेल.दरम्यान, ‘काँगे्रस’च्या तिकिटासाठी पाटील आणि महाडिक यांच्यात झालेली रस्सीखेच अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रृत आहे. काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व स्वत: आपण तिघेही इच्छुक आहोत. तिघांपैकी कुणालाही उमेदवारी द्या. मात्र, ‘सतेज’ना तिकीट नको, अशी मागणी महाडिकांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे उघडपणे केली. त्यामुळे काँगे्रसचे ‘श्रेष्ठी’ही धर्मसंकटात पडले होते.तथापि, प्रत्येक निवडणुकीत ‘सोयी’ची भूमिका घेणाऱ्या महाडिकांनाच काँगे्रसने दूर ठेवले आणि उमेदवारीची माळ ‘सतेज’ यांच्या गळ्यात पडली. तिथेच त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. जिल्हाध्यक्ष पी. एन. पक्षाचे उमेदवार म्हणून ‘सतेज’सोबत राहिले, तर स्वत:ची अपक्ष उमेदवारी मागे घेऊन प्रकाशअण्णा आवाडेंनीही ‘सतेज’नाच साथ दिली. त्यामुळेच त्यांची उमेदवारी अधिक ‘भक्कम’ झाली. मुश्रीफांनी ‘सतेज’ यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच ‘सतेज’ना पास दिला. त्यानंतर ‘मैत्र’ जपण्यासाठी सावकरांनीही त्यांनाच ‘बाय’ दिला. त्यामुळेच ‘सतेज’नी मारलेल्या किकचे ‘गोल’मध्ये रूपांतर झाले.२१ नोव्हेंबर २०१५च्या गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या ‘पास’च्या ‘शेरेबाजी’मुळे व्यासपीठावर असा हास्यकल्लोळ रंगला होता.