शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

कोल्हापूर : देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येऊन पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे ...

कोल्हापूर : देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येऊन पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.

मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालमधील निकालानंतर टीका केली. त्यावर पाटील यांनी भुजबळ यांचा तिखट शब्दात समाचार घेतला. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या गायकवाड अहवालाचे इंग्रजी भाषांतर करताना काही चुका झाल्यात का हे देखील स्पष्ट व्हायला हवे. याबाबत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजूनही मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण चांगल्या पध्दतीने काम करू शकू असे वाटल्याने त्यांनी पहिल्यांदा सारथी आणि नंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या नियोजन विभागांतर्गत घेतले आहे. आता बघू ते काय करतात ते.

चौकट

गडकरींना जमले ते शासनाला का नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेला औषध कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ दिले आणि तेथून आता ३० हजार रेमडेसिविर इंजक्शन्सचे उत्पादन सुरू झाले. जे गडकरींना जमते ते राज्य शासनाला का जमत नाही, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

चौकट

गायकवाडना एकदा तरी बोलावले का

आम्ही नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांनी याकामी इतके झोकून देऊन काम केले की त्यांच्या डोळ्याची पापणी पॅरालाईज झाली. माझा एक अधिकारी त्यांना रोज रुग्णालयात नेऊन आणत असे. तिथे उपचार झाले की पुन्हा ते कार्यालयात येऊन काम करत होते. इतके योगदान देणाऱ्या गायकवाड यांना एकदाही चर्चेसाठी बोलवावे, असे गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना का वाटलं नाही अशीही विचारणा पाटील यांनी केली.